भोसे (क), प्रतिनिधी, तीन-तीन टर्म आमदार झालेल्यांना अजून आमदारकी नीट कळाली नाही आणि एक महिन्यात आमदार झालेल्यांना कधी कळावी. राजकारणातली नैतिकता संपत चालली असली तरी आपण सर्वजण एकत्र राहून नैतिकतेचे राजकारण पुन्हा आणूया यासाठी गणेश दादा तुम्ही निश्चिंत रहा आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत असे प्रतिपादन करमाळा विधानसभेचे माजी आमदार संजय शिंदे यांनी व्यक्त केले. ते […]
ताज्याघडामोडी
नक्शा कार्यक्रमांतर्गत पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील मिळकतींचे नगर भूमापन कामकाज सुरू
नक्शा कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील जून 2025 मध्ये सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून ड्रोन सर्वेक्षणाची ओआरआय ( ऑर्थो रेक्टिफाइड इमेज) प्राप्त झाली आहे. त्यानुसार पंढरपूर , इसबावी, भटुंबरे, शेगांव दुमाला येथील पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील स्थावर मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नगर भूमापनाचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख उप अधीक्षक पूजा आवताडे यांनी दिली आहे. नागरी स्थानिक […]
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून कौतुक
महसुलमंत्री यांचे कडून शाबासकीची थाप..! सोलापूर – छत्रपती संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राबविलेले विविध उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले आहे. दिनांक २ व ३ आॅगष्ट रोजी नागपूर येथे राज्यातील जिल्हाधिकारी यांचे काॅन्फरन्स घेणेत आली. या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती […]
“विद्यार्थ्यांच्या भविष्याचे पालकच भूमिका आदर्श!!!”- आय. ए.एस.डॉ. किरण कुलकर्णी यांचे कर्मयोगी विद्यानिकेतन मधील व्याख्यानात प्रतिपादन.
पंढरपूर : सोमवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी श्री. पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर, संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे मराठी भाषा आणि आपण.. ह्या विषयावर आय. ए .एस. डॉ. किरण कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याला पालकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावून दाद दिली. प्रशालेत पासवर्ड या वाचन प्रेरणा कार्यक्रमांतर्गत.. वाचाल… तर वाचाल ! यावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात […]
पंढरपूरात महसूल सप्ताहाचा शुभारंभ उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी पुरस्कार वितरण
लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण पंढरपूर दि.(01):- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आज महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील महसूल कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचा वर्षभरातील कामगिरी बाबत उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आले. तसेच तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली. यावेळी नायब तहसिलदार व्ही.व्ही. बुचके, उत्कृष्ट मंडळ अधिकारी आर.बी. […]
कर्मयोगी इंस्टिट्यूट च्या विद्यार्थ्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेत निवड
कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील माजी विद्यार्थी पाराप्पा तुकाराम गुटूकडे या विद्यार्थ्याची बृहन्मुंबई महानगरपालिका येथे दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदावर निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. पाराप्पा गुटूकडे हे मूळचे हुलजंती गावाचे असून त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण शेळवे येथील कर्मयोगी इंस्टिट्यूटमधील सिव्हिल इंजिनियरिंग विभागामध्ये पूर्ण झाले. […]
पंढरपूर दि: २९ जुलै रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे नागपंचमी हा सण अतिशय उत्साहात साजरा झाला.
कर्मयोगी विद्यानिकेतन ही एक संस्कार आणि परंपरा जपत ज्ञानदान करणारी शाळा म्हणून पंढरपूर पंचक्रोशीमध्ये नावारूपास आली आहे. सण वार, रीती रिवाज, रूढी परंपरा ह्यांची सांगड निसर्गाशी घालत, जपत तंत्रज्ञानाकडे झेपावणाऱ्या ह्या नवीन पिढीला आपल्या संस्कारांची शिदोरी घेऊनच उंच भरारी मारायची आहे, असे कर्मयोगी विद्यानिकेतन च्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई म्हणाल्या. आणि म्हणूनच श्रावण महिन्यातील पहिला सण […]
पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटक च्या वतीने मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या समवेत झालेल्या कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये सर्व मागण्या मान्य
पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटक च्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब ,उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती या वेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर, उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, धनजी वाघमारे, दिनेश साठे, जयंत पवार सतीश सोलंकी व इतर पदाधिकारी समवेत […]
कर्मयोगी इन्स्टिटयूटच्या वीस विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड .
“कर्मयोगी प्लेसमेंट २०२५” श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील आठ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील बारा अश्या एकूण वीस विद्यार्थ्याची कॅम्पस मुलाखती मधून कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. पुणे येथील शाफ्लर इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून […]
पंढरपूर/प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना […]











