पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामार्फत ‘अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल ऑटोमेशन कंट्रोल’ या विषयावर दि.२२ जुलै २०२५ ते दि.०२ ऑगस्ट २०२५ अशा तब्बल दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी इंडस्ट्रियल ऑटोमेशन इंडस्ट्रीची रचना, फील्ड डिव्हाइसेसची माहिती, कंट्रोलर्सची ओळख तसेच पीएलसी विरुद्ध मायक्रोकंट्रोलर यांची सविस्तर माहिती देण्यात […]
ताज्याघडामोडी
हकालपट्टी केलेला बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे वैभव खेडेकर यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाने केलेल्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर वैभव खेडेकर कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी निर्णय घेतला. वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर […]
रात्री जेवून घरात झोपलं 5 जणांचं कुटुंब, सकाळी सगळेच बेशुद्ध, दोघांचा करूण अंत
सोलापूर शहरातील सिव्हील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळले आहेत. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांचा मुलगा हर्ष आणि चार वर्षांची मुलगी अक्षरा यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापुरातील लष्कर भागात सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली आहे. हे कुटुंब शनिवारी रात्री जेवण करून आपल्या […]
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी
सलग पाच वर्ष ग्रामपंचायत कर थकविणाऱ्यांना निवडणूक लढण्यास निर्बंध आणू : ना. जयकुमार गोरे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा सोलापूर- गावे समृध्द करण्यासाठी आणि गावातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने आता ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी गावातील […]
स्वेरीत ‘स्टार्टअप इग्निशन २.०’ ही व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धा संपन्न
पंढरपूर – गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी स्वेरीच्या ई-सेल व आयट्रिपल ई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप इग्निशन २.०’ या व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार […]
न्यू सातारा पॉलीटेकनिक कोर्टी, पंढरपूर मधील सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची इस्कॉन टेम्पल येथे औद्योगिक भेट.
माहिती – न्यू सातारा पॉलीटेकनिक कोर्टी, पंढरपूर येथील सिव्हिल विभागातील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांची इस्कॉन टेम्पल पंढरपूर येथे दिनांक १८/०८/२०२५ रोजी औद्योगिक भेट झाली. या भेटीमध्ये इस्कॉन टेम्पल चे प्रमुख श्री गणेश शिंदे साहेब यांनी सिव्हिल क्षेत्रातील बिल्डिंग प्लँनिंग, सिव्हिल क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कॉंक्रिट तंत्रज्ञान यावर माहिती दिली. तसेच सिव्हिल क्षेत्रातील चालू तंत्रज्ञान […]
न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलीटेक्निक) कोर्टी येथे ‘व्यक्तिमत्व विकास’ कार्यशाळा संपन्न
न्यु सातारा समूह मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट कोर्टी येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व भविष्यातील नोकरीची गरज ओळखून संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 19 ते 20 ऑगस्ट 2025 या दरम्यान 2 दिवसीय ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा मुंबई येथील प्रॉक्टर अँड गॅम्बल प्रायव्हेट लिमिटेड या […]
कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या धनश्री नाईकनवरे यांची नामांकित कंपनीमध्ये निवड.
इटॉन इंडिया इनोव्हेशन सेंटर मध्ये निवड, मिळाले ९ लाखांचे पॅकेज. श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील धनश्री नाईकनवरे या माजी विद्यार्थिनीची इटॉन इंडिया इनोव्हेशन सेंटर, पुणे या नामांकीत कंपनीमध्ये मुलाखती मधून निवड होऊन ९ लाखांचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. […]
न्यु सातारा कॉलेजमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
न्यु सातारा समूह संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलीटेक्निक) कोर्टी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोपालकाला व दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विक्रम लोंढे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडीबद्दल माहिती दिली. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दहीहंडी स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दहीहंडी स्पर्धेत विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस ही […]
पंढरपूर अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
मागील आर्थिक वर्षात 38.42 कोटी ढोबळ नफा पंढरपूर अर्बन बँकेस सन 2024-25 या आर्थिक वर्षात रू.38.42 कोटी रूपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी 113 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिली. यावेळी त्यांनी शासनाच्या व्याज परतावा योजनांची कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. बँकेची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या कर्मयोगी सभागृह, […]











