ताज्याघडामोडी

न्यु सातारा कॉलेजमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

न्यु सातारा समूह संचलित, न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलीटेक्निक) कोर्टी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोपालकाला व दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विक्रम लोंढे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दहीहंडीबद्दल माहिती दिली. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दहीहंडी स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दहीहंडी स्पर्धेत विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस ही यावेळी देण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्सफूर्तपणे सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजाराम निकम साहेब यांनीही शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन सचिन पुरी यांनी केले तर आभार सुरज जैयस्वाल यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *