सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार नाहीत असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. प्राधिकरणाने डिसेंबर 2020 पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच येत्या 20 सप्टेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही सुरु करा कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका […]
ताज्याघडामोडी
राज्यात 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम
राज्यात 2021-22 साठी ऊसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला.जे कारखाने 15 ऑक्टोबर 2021 पूर्वी उसाचे गाळप सुरु करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा निर्णयही या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल […]
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैशांची दिली होती ऑफर” आमदाराचं खळबळजनक विधान
आमदार श्रीमंत पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर भाजपचे माजी मंत्री आणि कागवडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता चांगलीच खळबळ माजली आहे. काँग्रेस सोडण्यासाठी भाजपने पैशांची ऑफर दिली होती, असं श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली आहे. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून […]
अन्नावाचून मायलेकींनी घरातच सोडले प्राण; हृदय पिळवटून टाकणारी घटना उघड
जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. राहत्या घरातच दोघींचा मृत्यू झाल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना शनिवारी उघडकीस आली असून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. झेलाबाई पोचू चौधरी (आई) आणि माया मारोती पुलगमकर (मुलगी) अशी […]
पंढरपूर शहरातून पुन्हा दोन मोटारसायलची चोरी
पंढरपूर शहरातील गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मोटारसायकली चोरटे हातोहात लंपास करत असल्याच्या घटना गेल्या काही महिन्यात वारंवार घडत असून आता पुन्हा ७ व ८ सप्टेंबर रोजी शहरातून दोन मोटर सायकली चोरटयांनी लंपास केल्या आहेत.या प्रकरणी दोन्ही मोटार सायकलच्या मालकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनुसार मकरंद पुरुषोत्तम कुलकर्णी रा.गोविन्दपुरा पंढरपुर यांचे […]
पंढरपूरात मॉर्निग वॉक वरून परतणाऱ्या डॉक्टर पत्नीचे सव्वालाखाचे मंगळसूत्र लंपास
पंढरपूर शहरात गेल्या काही दिवसात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.मोटार सायकल चोरीच्या घटना तर नित्याची बाब झाली असून अनेकवेळा भरदिवसा चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याचेही दिसून येते.शहरातील धनिकांची वसाहत समजल्या जाणाऱ्या परदेशी नगर सारख्या काही उपनगरात घरफोडी व छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी भरदिवसा वयोवृद्ध डॉक्टर आपल्या पत्नीसह […]
महिलेसोबत अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला चोप, धक्कादायक प्रकार
महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करत अश्लील संभाषण करणाऱ्या एका मंत्रालयातील अधिकाऱ्याला पीडित महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. सामाजिक संस्था नोंदणी करून देण्याचा बहाण्याने सदर अधिकारी या महिलेशी सलगी करत होता. मारहाणीचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवाजी आव्हाड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडे दाद मागितली, मात्र पोलिसांनी […]
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याचा आणि पुढे ढकलण्याचा अधिकार आहे, राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवले आहे. आता 23 सप्टेंबर 2021 रोजी या प्रकरणी […]
शरद पवार,देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांच्या विरोधात अश्लील भाषेच्या पोस्ट
राज्यातील आजी माजी मंत्र्यांची बदनामी करणार्या फेसबुक वापरकर्त्यां विरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, https://www.facebook. com/rahul. mule. 37853 हे फेसबुक खाते वापरणाऱ्याने त्याच्या फेसबुक खात्यावरुन वेगवेगळया अश्लिल व घाणेरडया भाषेमध्ये पोस्ट केल्या. तसेच काही पोस्टला रिप्लाय देणा-या लोकांना असभ्य भाषेत रिप्लाय दिला. काही पोस्टमध्ये मराठा समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये […]
चंदनतस्करीत चक्क सरपंचच निघाला आरोपी
चंदनतस्करी करणाऱया दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, या चंदनतस्करीमध्ये आणखी दोघांची नावे समोर आली असून, तो एका पक्षाचा सरपंच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सहा किलो चंदन व दुचाकी असा सुमारे एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. अमर नामदेव पवार (वय 30, रा. आडवी पेठ, प्रगती शाळेसमोर राहुरी), विजय रामदास पवार (वय 38, […]











