गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अधिकच्या महिन्यात सासरा अन् मेहुण्याने केली जावयाची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

जालनामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण जालना शहर हादरलं आहे. यामध्ये सध्या अधिकचा म्हणजे धोंड्याचा महिना चालू आहे. चालीरीतीमुळे या महिन्यात लेक जावयाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. जावयाला दान देत मुलगी आणि जावयाला धोंडे जेवण करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. पण, या महिन्यात मेव्हणे आणि सासऱ्याने आपल्या जावयाचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात […]

ताज्याघडामोडी

पोलीस भरती प्रशिक्षण अकादमीत मुलींचे लैंगिक शोषण, रेल्वे पोलिसाला मैत्रिणीसह अटक

पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवणाऱ्या रेल्वे पोलिसानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रेल्वे पोलिसात कार्यरत पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पॉक्सो व विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी समाधान गावडे (वय २८ वर्ष) आणि त्याला मदत करणारी त्याची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आत्महत्या केल्याचा बनाव रचत मुलीचा जन्मदात्याकडून खून, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

मुखेड तालुक्यातील मनु तांडा येथे 2 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आई-वडिलांनी या मुलीच्या पार्थिवावर घाईत अंत्यसंस्कार केले. यामुळे हा घातपात असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये रंगू लागली. याच संशयाने पोलिसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस तपासात पित्यानेच मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आरोपी पित्याला 10 ऑगस्टला अटक केली आहे. मुलीचा […]

ताज्याघडामोडी

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री नबाव मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. सक्तवसुली संचलनालयाने सर्वोच्च न्यायालयात जामिनीला विरोध केला नसल्याने मलिक यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे नवाब मलिक तब्बल १ वर्ष ५ महिन्यानंतर जेलबाहेर येणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २ […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत, १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार

राज्यात १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार, तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असून मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात पाऊस पडला नाही. मात्र, शेवटच्या […]

ताज्याघडामोडी

बहिणीची ‘ती’ भेट ठरली अखेरची ! तीन भावांना एकत्र गमवावा लागला जीव

बुलढाणा जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नांदुरा येथे दुचाकीने अज्ञात ट्रकला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात दोन सख्खे, तर एक चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर घडली आहे.बहिणीला भेटून परत येत असताना या भावांवर काळाने घाला घातला आहे.मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील कंडारकर […]

ताज्याघडामोडी

कर्मचाऱ्याने पार्सलमध्ये दिले शिळे अन्न, ग्राहकाची मालकाकडे तक्रार, पेटला वाद अन् घडला अनर्थ

मुकुंदवाडी बस स्थानकासमोरील आरजू हॉटेलमध्ये ग्राहकाने बिर्याणीची ऑर्डर दिली. मात्र बिर्याणी चांगली नसल्याचे लक्षात येताच ग्राहकाने नूडल्स ऑर्डर केली. यावेळी देखील शिळे नूडल्स मिक्स करत असल्यामुळे ग्राहकाने मालकाकडे तक्रार केली. मालकाने ग्राहकाची तक्रार ऐकून न घेता तुझं नेहमीच झाले, असे म्हणत लोखंडी कवचाने ग्राहकाचे डोके फोडले याप्रकरणी मालक आणि इतर कर्मचाऱ्यांवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा […]

ताज्याघडामोडी

‘फॅबटेक’ फार्मसी विभागातील १० विद्यार्थ्यांची हेट्रोहेल्थकेअर व थ्री जेन कंपनी मध्ये निवड

सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची 3 GEN व Hetro HealthCare येथे Production आणि IT या पदांवर निवड झालेली आहे. यामध्ये महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी १० विद्यार्थ्याची निवड करण्यात आली ही निवड सक्षम मुलाखती द्वारे करण्यात आलेली आहे. या निवडीसाठी कंपनीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. हि मुलाखत १७ जुन २०२३ रोजी घेण्यात आली […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची “सॅप पार्टस प्रा. लि.” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी “सॅप पार्टस प्रा. लि.” कंपनीची २००९ साली स्थापन झाली आहे. हि बहुराष्ट्रीय नामांकित मेकॅनिकल कंपनी असुन या कंपनीचे पुणे येथे तीन कारखाने आहेत. याशिवाय नाॅर्थ अमेरिका, युरोप येथे शाखा असून हि कंपनी मेकॅनिकल सील, संरक्षण, बांधकाम, खाणकाम, शेतीविषयक अवजारे, ऑटोमोबाईल्स इत्यादी क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे अशा या कंपनीत पंढरपुर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज […]

ताज्याघडामोडी

शाळेत पोरं भांडली, बाहेर पालक भिडले; मारामारीत एकाचा मृत्यू

शाळेत खेळत असताना दोन लहान मुलांमध्ये झालेला वाद हा पालकांपर्यंत पोहोचला. यावरुन पालकांमध्ये झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात घडला आहे. या प्रकरणी तिघा जणांवर शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तिघांनाही ताब्यात घेत अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे. सद्दाम सत्तार शेख (वय […]