सांगोला: दि.१४ जानेवारी ते २८ जानेवारी महाराष्ट्र शासनाने जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा घोषित केला आहे. याचे औचित्य साधून फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, या सर्व विद्याशाखेमध्ये जागतिक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रा. सुनील नष्टे यांच्या हस्ते विद्देची देवता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रा. सुनील नष्टे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांचा सत्कार फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलताना प्रा. सुनील नष्टे म्हणाले कि, भाषा ही संस्कृतिवाहक आहे. ग्रामीण भाषा ही जोपासली पाहिजे. आपल्या मराठी संस्कृतीचे संवर्धन केले पाहिजे, विद्यार्थांनी आपल्या शैक्षणिक पदवीबरोबरच चांगुलपणाचेही सर्टिफिकेट मिळवले पाहिजे. माता, माती, आणि मातृभाषा हे तीन घटक आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहेत. मराठी भाषेमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भावना आहे. विद्यार्थांनी मराठी पुस्तके वाचली पाहिजेत, कसे जगावे हे मराठी भाषा शिकविते, जगण्यातले सौन्दर्य मराठी भाषा शिकविते. असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकाने स्वभाषीक असावे, माणसाने माणूसपण जपले पाहिजे.प्रत्येकाने मराठी भाषेबद्दल आदर बाळगला पाहिजे. जगातील सर्वात सुंदर भाषा हि मराठी आहे, कारण मराठीच्या प्रत्येक शब्दाचे अनेक अर्थ होतात. दोन मने जोडण्याची ताकत मराठीमध्ये आहे. मराठी भाषेत भावनेचा ओलावा असतो. मराठी भाषेचे सार व महत्व त्यांनी यावेळी विशद केले. या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सर्व शासकीय नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस, अकॅडमिक डीन प्रा. टी. एन.जगताप, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. संगीता खंडागळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. संगीता खंडागळे यांनी केले.
Uncategorized
पंढरपूर सिंहगड मध्ये “शाकाहार व व्यसनमुक्ती” याविषयावर श्रीरंग बागल यांचे व्याख्यान संपन्न
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने “शाकाहार व व्यसनमुक्ती” याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या सुरुवातीस व्याख्याते श्रीरंग बागल यांचे स्वागत रोटरी क्लब चे […]
पंढरपूर व परिसराचा विकास साधनार्या संशोधनावर भर : रोहन परिचारक
कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुणे स्थित भारतातील अग्रगण्य “सेंटर फॉर ऍडव्हान्सड स्टडिझ इन पॉलिसी रिसर्च” (कॅस्पर) या संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामार्फत कॅस्पर तर्फे कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेंटर फॉर एक्सलंस इन सोशओ-इकोनॉमिक डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन ची स्थापना करण्यात आली. सेंटर फॉर ऍडव्हान्सड स्टडिझ इन पॉलिसी रिसर्चचे संशोधक पंढरपूर आणि परिसरचा अभ्यास करून […]
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेत “७३ वा प्रजासत्ताक दिन” साजरा
बुधवार, दि.२६ जानेवारी २०२२ रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे “७३ वा प्रजासत्ताक दिन” कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री.रोहनजी परिचारक यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद, प्राचार्या तसेच शिक्षकेत्तर कर्मचा-यांना खूप-खूप शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक (Trustee) डॉ.श्री पारस राका सर उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाची सुरवात सकाळी […]
युटोपियन शुगर कामगारांना देणार १२ टक्के पगारवाढ,गाळप क्षमताही वाढविली जाणार
युटोपियन शुगर्स लि. येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात परिचारक बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, सी.एन. देशपांडे, महादेव लवटे, सुरेश टीकोरे यांचे समवेत कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी ,कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, युटोपीयन शुगर्स या कारखान्याची उभारणी ही मुळातच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे […]
जैन धर्म तीर्थ श्री सम्मेद शिखरजी याचे पावित्र्य राखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत
जैन धर्म तीर्थ श्री सम्मेद शिखरजी याचे पावित्र्य राखण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याची मागणी सकल जैन समाज व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने अनुप शहा यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे केली होती केलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संविधानाच्या अनुच्छेद २९ अन्वये जैन समाजाचे सर्वोच्च तीर्थक्षेत्र […]
बाय बाय मित्रानो ! स्टेट्स ठेवत महाविद्यालयीन तरुणाने घेतला जगाचा निरोप
औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी भागातील ताजनापूर येथे मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. मित्रांसाठी बाय बाय स्टेटस ठेवत महाविद्यालयीन विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. राजेश ज्ञानेश्वर काळे (१८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थी असणाऱ्या राजेशने घरातील सर्व सदस्य शेतात कामासाठी गेले असताना आपल्या मोबाईलवर बाय […]
स्वेरीचे माजी विद्यार्थी डॉ. सुधीर सिंदगी यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे नेतृत्व करण्याचा बहुमान
भारत सरकारच्या नौवहन महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या बैठकीमध्ये जहाज डिझाईन आणि बांधकाम समितीसाठी तज्ञ भारतीय प्रतिनिधी म्हणून स्वेरीचे माजी विद्यार्थी डॉ. सुधीर सिंदगी यांची निवड केली आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या परिषदेत भारताचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाल्यामुळे डॉ. सुधीर सिंदगी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट […]
पंढरपूरात कार शोरूम मध्ये वैतागलेल्या कार मालकाने केली तोडफोड
पंढरपूर शहरानजीक असलेल्या वाखरी हद्दीत रेनॉल्ट कार कंपनीचे शोरुम असून दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास रेनल्ट क्वीड गाडीमधुन आलेल्या इसमाने त्याची गाडी शोरुमचे समोर लावुन गाडीतुन एक अंदाजे 3 ते 4 फुट लांबीचा लोखंडी पाईप घेवुन शोरूम मध्ये प्रवेश करत तुम्ही मला बाहेरच्या गाडीची चावी द्या नाहीतर मी शोरुम मधील गाड्या व […]
सरकोली पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेतील रकमेवर तत्कालीन डाकपालाचा डल्ला
सरकोली शाखा डाकघर येथील श्री महेशकुमार चंद्रकांत भोसले रा सरकोली ता पंढरपूर यांनी त्यांचे सुकन्या समृद्धी खाते पुस्तक क्रमांक पंढरपूर हेड पोस्ट ऑफिस येथील खिडकी वरती रक्कम जमा करण्याकरिता सादर केले असता सुकन्या समृद्धी खाते पुस्तक क्रमांक मधील शिल्लक आणि Finacle Software मधील शिल्लक यामध्ये तफावत आढळली. या पुस्तकामध्ये सरकोली शाखा डाकघर येथे दिनांक .. […]











