राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची दिनांक ०४ जुलै रोजी पंढरपूर येथे पोलीस पाटील संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान संघटनेच्या विविध प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा करून उपमुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. भेटीदरम्यान पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, सेवानिवृत्तीचे वय आणि पेन्शन योजना, कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडचणी, तसेच इतर सोयी-सुविधांविषयी […]
Uncategorized
मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते होणार रणजित शिंदेंच्या संपर्क कार्यालयाचे शेगाव दुमालात उदघाटन
भाजपच्या झेंडयाखाली माढ्यातील शिंदे गट आणि पंढरपूर तालुक्यातील परिचारक गट यांची युती आणखी मजबूत होणार माढा विधानसभा मतदार संघात पंढरपुर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश २००७ मध्ये झालेल्या मतदार संघ पुनर्रचनेत करण्यात आला.माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी विधानसभेत ६ वेळा प्रतिनिधित्व केले आहे.तर २००९ मध्ये मतदार संघ पुन्हा रचना झाल्यानंतर […]
मगरवाडीत शिस्तीचा आदर्श उपक्रम; विद्यार्थिनींच्या दंडातून शाळेला उपयुक्त साहित्य
मगरवाडी (ता. पंढरपूर) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मगरवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे विद्यार्थिनींनी विनाकारण शाळा बुडवू नये व नियमित उपस्थिती राहावी, या उद्देशाने एक अभिनव व शिस्तीला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आकारण्यात आलेल्या माफक दंडातून जमा झालेल्या निधीतून शाळेसाठी बॉक्स आरसा व भिंतीवरील घड्याळ खरेदी करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन […]
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरोधी दिन (International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. स्वप्नील मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट केले. तरुणांनी सकारात्मक जीवनशैली स्वीकारून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे त्यांनी […]
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती
गिरिम, ता. दौंड जि. पुणे येथील मुळ रहिवासी असलेले व सध्या अहिल्यानगर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना राज्य सरकारने पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती दिली आहे. आज राज्य सरकारने राज्यातील 224 पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक ते पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती दिली आहे. सेवा कालावधी व सेवा अभिलेख पडताळणी आणी छाननी […]
तांदूळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४० लाखांची मदत
आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याने मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबीयांना मिळाला आर्थिक आधार काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात पंढरपूर-सातारा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात पिकअप वाहन विहिरीत कोसळून पंढरपूर तालुक्यातील एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली होती. सदर घटनेनंतर आमदार समाधान आवताडे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन […]
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.
प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पंढरपूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करून उज्जल यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा यावर्षीचा प्रथम वर्ष चा निकाल ८७% टक्के लागला असून हा निकाल जिल्ह्या अव्वल आहे. यामध्ये प्रथम क्रमांक […]
पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी
संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती देशविदेशात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.याही वर्षी दि. 14/5/2026 रोजी पंढरपूर शहर तालुक्यात शिवभक्तांकडून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध ठिकाणी अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे.तर जयंती निमित्त पंढरपुर शहर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व […]
राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश
तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर च्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागामधील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेचा वापर करून आर एफ आयडिया आधारित पेट्रोल पंप स्वयंचलन प्रणाली या विषयावर प्रकल्प सादर केला होता. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागातील कु. सारंग दिनेश शिंदे, […]
पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?
वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने प्रथमच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष स्वबळावर बसविण्याइतके बहुमत प्राप्त केले आहे.जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ३८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.मात्र याच वेळी पंढरपूर तालुक्यात भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.तर दुसरीकडे पंढरपूर तालुका […]










