कोल्हापूर: राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना सातारा येथे आलेला ऑक्सिजनचा टॅंकर कोल्हापूरसाठी कि सातारासाठी यावरून बराच वाद झाला. चार तास दोन जिल्हाधिकाऱ्यांच्या वादावादीनंतर अखेर हा टॅंकर सातारा येथेच नेण्यात आला आणि सातारा जिल्हा रुग्णालयात तो खाली करण्यात आला. सध्या राज्यात अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनची मोठी टंचाई आहे त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे ऑक्सिजनचा टँकर दिला जात […]