ताज्याघडामोडी

माजी सरपंचाच्या भाच्यावर भरचौकात हल्ला  

सांगलीत कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायत सदस्याची हत्या होऊन दोन दिवस उलटले नाहीत, तोच तालुक्यात आणखी एक खुनी हल्ला झाला आहे. पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत यांचा भाचा अमर उर्फ संतोष जयराम आटपाडकर याला दोघा अज्ञात हल्लेखोरांनी भोसकले आहे. 

कवठेमहांकाळ शहरातील धुळगाव रस्त्यावरील मुख्य चौकात ही घटना घडली. अमर जयराम आटपाडकर याच्या छातीवर, पोटावर, डोक्यात तसेच शरीरावर इतर ठिकाणी वार करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. हल्ल्यात अमर आटपाडकरचा मित्र विजय मानेही जखमी झाला आहे.अमर आटपाडकर याची परिस्थिती गंभीर आणि नाजूक असल्याची माहिती आहे. अमर आटपाडकर यांना कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्‍यानंतर पुढील उपचारासाठी मिरजेला हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *