ताज्याघडामोडी

नावेतुन निघाली शिवछत्रपतींची मिरवणुक… चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये साजरी झाली अनोखी शिवजयंती! जय भवानी! जय शिवराय! हर हर महादेव! च्या जयघोषानेे दुमदुमले वाळवंट

पंढरपूर (प्रतिनिधी):- आज हिंदवी स्वराज्य संस्थापक कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पंढरीतील चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकी संघाने या अनोख्या शिवजयंतीचे आयोजन केले होते. यावेळी नावेमधुन शिवछत्रपतींची भव्य मिरवणुक काढण्यात आली. जय भवानी! जय शिवाजी! हर हर महादेव! च्या जयघोषाने चंद्रभागेचे वाळवंट दुमदुमुन गेले होते. महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी याबाबत एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली.

चंद्रभागेच्या पाण्यावर तरंगणार्‍या होडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना गणेश अंकुशराव यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्याची आणि मर्द मावळ्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा उपस्थितांना ऐकवली. आपण दरवर्षी अनोख्या पध्दतीने व मोठ्या उत्साहात महाराजांची जयंती साजरी करत असतो. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आवश्यक त्या उपाययोजनांचा अवलंब करत ही जयंती तेवढ्याच उत्साहात साजरी करत आहोत. छत्रपती शिवरायांच्या विचारांपासुन व पराक्रमापासुन  तरुणांनी प्रेरणा घ्यावी. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये छत्रपती शिवरायांची भव्य मिरवणुक यावेळी काढण्यात आली. महर्षी वाल्मिकी संघाच्या तमाम कार्यकर्त्यांनी यावेळी छत्रपती शिवरायांच्या नावाचा एकच जयघोष केला. जय भवानी! जय शिवराय व हर हर महादेव च्या जय्घोषाने निनादुन गेलेला चंद्रभागेचा परिसर यावेळी अवघा शिवमय झालेला आढलुन आला. यावेळी जयवंत अभंगराव, राहुल परचंडे, सुरज कांबळे, रामभाऊ सुरवसे, श्रीनिवास उपळकर, सुरज नेहतराव, संदीप परचंडे, दीपक अभंगराव, कृष्णा वाडेगावकर, अरविंद नाईकवाडी, स्वप्नील वाघेरलू, अभय अंकुशराव, प्रथमेश पवार, अप्पा करकमकर, गोविंद करकमकर, नवनाथ परचंडराव, तात्या अधटराव, दिपक कोरे, मनोज कोरे, नितीन कांबळे, विशाल माने, गणेश वाघमारे व आदिवासी महादेव कोळी जमातीचे अनेक बांधव उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *