ताज्याघडामोडी

पंढरपूरात क्रॉगेस अध्यक्षा सोनियाजी गांधी व आ.प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रम

पंढरपूरात क्रॉगेस अध्यक्षा सोनियाजी गांधी व आ.प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध कार्यक्रम

पंढरपूर : अखिल भारतीय अध्यक्षा सोनियाजी गांधी व आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त तालुका क्रॉग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश (तात्या) पाटील व शहर कॉग्रेस च्या वतीने श्री विठ्ठल मंदिरामध्ये गरूड खांबा जवळ दिर्गायुष्य लाभावे या साठी प्रार्थना करण्यात आली व नामदेव पायरी जवळ भाविकांना पेढे वाटप मा.श्री.राजेश भादुले व माजी नगरसेवक रामा भिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कुष्टरोगी वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान राबवले व कुष्टरोग्याना थंडी पासुन संरक्षण मिळावे या साठी उपदार शाली चे वाटप नागेश गंगीकर (कॉग्रेस,जिल्हा सरचिटणीस) यांच्या हस्ते करण्यात आले.कुष्टरोग वसाहत स्वच्छता अभियान मा.श्री.द.बडवे (अध्यक्ष, ब्राम्हण सेल सोलापूर जिल्हा कॉग्रेस (आय)) यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले. या वेळी   समाधान रोकडे, सुहास भाळवणकर, मिलींद अढवळकर, राजु उराडे, हनुमान जाधव, महंमंद (मुन्ना ) भाई इ.उपस्थित होते. स्वच्छता अभियान च्या कार्यक्रमात नगरपालिका कर्मचारी श्री.दत्तात्रय चंदनशिवे (संतपेठ विभाग सुपरवायझर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कॉग्रस चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *