ताज्याघडामोडी

रेल्वे पुलापासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

रेल्वे पुलापासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून उपजिल्हा रुग्णलयामागील मांडव खडकी रस्त्यावरून गाढवाद्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना मिळाली होती.या बाबत त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर प्रकरणातील फिर्यादी पोलीस नाईक संदीप पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पो.कॉ.सुर्वे,पो.कॉ.हुलजंती,पो.ना.तडवी,पो.कॉ.मुजावर हे मांडव खडकी येथे गेले असता दहा गाढवांच्या पाठीवर अवैध वाळू उपसा केलेली पोती लादून तीन इसम पाठीमागे येत असल्याचे दिसले.पोलीस आल्याचे पाह्ताच सदर तिघेही इसम पळून गेले.सदर प्रकरणातील अवैध रित्या उपसा केलेली वाळू व वाळू उपसा करण्याचे साहित्य या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. 

  या प्रकरणी विशाल नेमाडे,संतोष जाधव यासह एका अज्ञात इसमावर भा.दं.वि. कलम ३७९,३४ व गौण खनिज कायदा कलम ४(१)४(क),२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *