ताज्याघडामोडी

मी शरद कोळी,मी अनेक पोलीस तलाठी घरी पाठविले आहेत माझे नाव घेतले कि भल्याभल्याना धडकी भरते !

मी शरद कोळी,मी अनेक पोलीस तलाठी घरी पाठविले आहेत माझे नाव घेतले कि भल्याभल्याना धडकी भरते !

शरद कोळी विरोधात  खंडणी आणि दमदाटीचा गुन्हा दाखल 

धाडस संघटनेचा संस्थापक शरद कोळी याच्याविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात खंडणी आणि दमदाटी व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून  ऋषीराज सतीश बाबर वय: 24, जात: मराठा, धंदा: शेती, रा. जत रोड, चव्हाण मळा सोनंद ता. सांगोला यांनी या बाबत फिर्याद दाखल केली आहे. 
  सदर फिर्यादीत नमूद केल्यानुसार  
      ऋषीराज सतीश बाबर वय: 24, जात: मराठा, धंदा: शेती, रा. जत रोड, चव्हाण मळा सोनंद ता. सांगोला मोनं. 7097407407, सध्या सांगोला पोलीस ठाणे येथे समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब लिहुन देतो की,मी वरील ठिकाणी स्वत:चे शेतातील वस्तीवर घरात आर्र्इ वडील, व एक भाउ यांचेसह राहणेस आहे. मला नमुद ठिकाणी शेती असुन मी शेती करुन उपजिवीका करतो.दि. 01/01/2020 रोजी सायंकाळी 07:30 ते रात्री 09:00 वा पर्यंत सोनंद गावातील शिवाजी चौक सोनंद ता. सांगोला येथे आमच्या गावातील कुबेर मंडले, सिध्देश्वर यादव, अश्वीनी यादव, मारुती मंडले व त्यांचे सहकारी यानी धाडस या संघटनेच्या शाखेचे उद्घाटन केलेले होते. सदर उद्घाटनास अध्यक्ष शदर कोळी व त्याचे बरेच सहकारी बाहेर गावातुन चार चाकी गाडया घेवुन आमच्या गावात आलेले होते. उद्घाटनाच्या वेळी धाडस संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी रा. अर्धनारी ता. मोहोळ यानी गावातील लोकाना उद्देशुन माझे नाव घेतले की माणसाना धडकी भरते, माझी सर्वत्र दहशत आहे, मी बरेच पोलीस तलाठी घरी घालवले आहेत. आमच्या संघटनेच्या कोणी नादी लागेल तर याद राखा. अशी अरेरावीची भाषा वापरुन गावातील लोकाना दमदाटी केली होती. परंतु गावातील लोकानी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. धाडस या संघटनेचे गावात सिध्देश्वर यादव, अश्वीनी यादव, कुबेर मंडले व मारुती मंडले सर्व रा. सोनंद ता. सांगोला असे लोक आहेत. शरद कोळी यांच्या नावाचा वापर करुन हे लोक गावात दहशत पसरवीत आहेत.दि. 08/01/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाचे सुमारास कुबेर मंडले, सिध्देश्वर यादव यानी फोन करुन ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ सोनंद ता. सांगोला येथे बोलावुन घेतले. त्यामुळे मी व शहाजी काशीद असे गेलो असताना, धाडस संघटनेचे आमच्या गावातील अध्यक्ष मारुती मंडले, सिध्देश्वर यादव व कुबेर मंडले यानी आमच्याजवळ येवुन, तुम्हाला अध्यक्षानी काय सांगीतले समजले नाही का? अध्यक्षांच्या अंगावर किती सोने आहे माहिती आहे का. सगळया दोन नंबर धंदयाचे हप्ते गाळा करणे हे आमच्या संघटनेचे काम आहे. तुमच्याविरुध्द वाळुचे गुन्हे दाखल आहेत, तुमच्याविरुध्द तहसीलदारला पुन्हा कारवार्इ करायला लावीन, तुम्हाला अध्यक्षांचे वजन माहिती नाही, महसुल व पोलीस खाते शरद कोळी दादाना घाबरते, आपल्या गावात कोरडा नदीतुन वाळुचा बेकायदेशीर धंदा चालु करुन आमच्या संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी याना आमच्यातर्फे 50,000/- रु हप्ता दरमहा दयावा लागेल. नाहीतर अध्यक्ष तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्ही एकदा 50000/- रु दिले की बाकीचे सगळे शरद कोळी दादा बघतील त्यांची सगळीकडे तेवढी दहशत आहे. नाहीतर तहसीलदारला सांगुन तुझ्यावर खोटी वाळु चोरीची कारवार्इ करायला लावु असा दम देवुन शरद कोळी यांच्या धाडस या संघटनेच्या नावाने खंडणी मागीतली. त्यावेळी मी व शहाजी काशीद त्यांच्या भितीने त्याना काही बोललो नाही, परंतु याबाबत गावातील लोकाना सांगीतले. आमच्याप्रमाणे आनंदराव दत्तात्रय काशीद यानाही वरीलप्रमाणेच खंडणी धाडस संघटनेच्या कार्यकत्र्यानी खंडणी मागणी केली असलेचे मला त्यांच्याकडुन समजले आहे. दि. 26 जानेवारी रोजी या सर्व प्रकाराबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत याबाबत सविस्तर ठराव घेवुन कारवार्इकरीता महसुल व पोलीस याना पत्र देण्याचे गावातील लोकानी ठरविल्याने याबाबत आम्ही तक्रार दिली नव्हती.गावातील कुबेर मंडले, मारुती मंडले, सिध्देश्वर यादव यानी मागीतलेप्रमाणे आम्ही त्याना खंडणी दिली नाही याचा राग मनात धरुन गावात दहशत पसरविण्याकरीता व खंडणी वसुल करण्याचे उद्देशाने दि. 23/01/2020 रोजी सायंकाळी 07:30 ते 08:30 वाचे दरम्यान धाडस संघटनेचे सोलापुर जिल्हाध्यक्ष प्रदिप जाधव रा. जुनोनी ता. मंगळवेढा तसेच त्यांच्यासोबत सुमारे 8 ते 10 लोक क्रुजर गाडी घेवुन आमच्या गावात आले. त्यावेळी मी व माझेसोबत प्रविण शंकर काशीद, शहाजी काशीद, जितेंद्र काशीद, लल्लन पवार, अतुल पाटील, आण्णासो पाटील, विकी पाटील, आकाश पाटील, साहेबराव काशीद, आनंदराव काशीद सर्व रा. सोनंद वगैरे लोक गावातील सोनंद चौकात नेहमीप्रमाणे गप्पा मारत थांबलो होतो. सिध्देश्वर यादव याने आमच्याजवळ येवुन सांगीतले की जिल्हाध्यक्ष आले आहेत व त्यानी सर्वाना सोनंद सांगोला रोडवरील यादव यांच्या वस्तीजवळ बोलावले आहे असे सांगीतलेने आम्ही सर्वजण सिध्देश्वर याच्यासोबत तेथे गेलो. त्यावेळी प्रदिप जाधव व त्यांच्यासोबत असलेल्या आमच्या गावातील धाडस संघटनेच्या अश्वीनी यादव यानी आम्हा सर्वाना तुम्ही वाळु चालु करुन दादाना हप्ता देणार आहात की नाही? असे विचारले. त्यावर माझे सोबतचे सर्वानी आम्ही वाळु चोरी करीत नाही, आम्ही हप्ता देणार नाही असे सांगीतलेने त्यानी सोबत आणलेल्या क्रुजर गाडीतुन सुमारे 08 ते 10 अनोळखी मुले हातात काठया घेवुन उतरली व आमच्याकडे शिवीगाळी करीत पळत आले. हातातील काठयाचा धाक दाखवित त्यानी व कुबेर मंडले, अश्वीनी यादव, सिध्देश्वर यादव यानी मिळुन आमच्यातील शहाजी काशीद, प्रविण काशीद, महीपती बोराडे, अतुल पाटील तसेच मला हाताने व लाथाबुक्क्यानी मारहाण केली. भितीने आमच्यातील बरेचजण पळुन गेले. त्याचवेळी गावातील बरेच लोक तेथे जमा होवु लागल्याने ते लोक गाडीतुन पळुन गेले. व त्यांच्यापैकीच कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर पोलीस गाडी गावात आली. त्यानंतर जमलेल्या लोकांकडुन माहिती मिळाली की क्रुजर गाडीतुन जे 8 ते 10 लोक आलेले होते त्यामध्ये लक्ष्मण कोळी व परशु कोळी दोघे रा. उमदी ता. जत जि. सांगली हे दोघे व त्यांचे इतर सहकारी होते. त्यानंतर आम्ही आमच्यातील पळुन गेलेल्या लोकाना शोधुन खाजगी वाहने घेवुन पोलीस ठाणेस तक्रार देण्याकरीता आलो आहोत, त्यामुळे उशीर झाला आहे.तरी दि. 01/01/2020 रोजी शरद कोळी रा. अर्धनारी ता. मोहोळ यानी सायंकाळी 07:30 ते रात्री 09:00 वा पर्यंत सोनंद गावातील शिवाजी चौक सोनंद ता. सांगोला येथे आमच्या गावातील कुबेर मंडले, सिध्देश्वर यादव, अश्वीनी यादव, मारुती मंडले व त्यांचे सहकारी यानी धाडस या संघटनेच्या शाखेचे उद्घाटन केलेले होते. उद्घाटनाच्या वेळी शरद कोळी यानी दहशत पसरविणारे गावातील लोकांच्या मनात भिती निर्माण करण्याकरीता दमदाटी देवुन भाषण केले. त्यानंतर धाडस संघटनेचे पदाधिकारी यानी शरद कोळी यांच्या नावाचा गैरवापर करुन दादागीरी व दहशत माजविण्यास सुरुवात केली. दि. 08/01/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाचे सुमारास सोनंद ग्रामपंचायतीजवळ कुबेर मंडले, सिध्देश्वर यादव यानी मला व शहाजी काशीद याना बोलावुन घेवुन शरद कोळी याने केलेल्या भाषणाचा आधार घेवुन तुम्हाला अध्यक्षानी काय सांगीतले समजले नाही का? अध्यक्षांच्या अंगावर किती सोने आहे माहिती आहे का. सगळया दोन नंबर धंदयाचे हप्ते गाळा करणे हे आमच्या संघटनेचे काम आहे. तुमच्याविरुध्द वाळुचे गुन्हे दाखल आहेत, तुमच्याविरुध्द तहसीलदारला पुन्हा कारवार्इ करायला लावीन, तुम्हाला अध्यक्षांचे वजन माहिती नाही, महसुल व पोलीस खाते शरद कोळी दादाना घाबरते, आपल्या गावात कोरडा नदीतुन वाळुचा बेकायदेशीर धंदा चालु करुन आमच्या संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी याना आमच्यातर्फे 50,000/- रु हप्ता दरमहा दयावा लागेल. नाहीतर अध्यक्ष तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्ही एकदा 50000/- रु दिले की बाकीचे सगळे शरद कोळी दादा बघतील त्यांची सगळीकडे तेवढी दहशत आहे. नाहीतर तहसीलदारला सांगुन तुझ्यावर खोटी वाळु चोरीची कारवार्इ करायला लावु असा दम देवुन शरद कोळी यांच्या धाडस या संघटनेच्या नावाने खंडणी मागीतली. व खंडणी दिली नाही म्हणुन दि. 23/01/2020 रोजी सायंकाळी 07:30 ते 08:30 वाचे दरम्यान आम्हाला गावातील लोकाना सोनंद सांगोला रोड यादव वस्ती सोनंद येथे प्रदिप जाधव सोलापुर जिल्हाध्यक्ष धाडस संघटना यानी येवुन बोलावुन घेवुन हप्त्याची मागणी केली व हप्ता देण्यास विरोध केल्याने प्रदिप जाधव, त्यांच्यासोबत आलेले अनोळखी 08 ते 10 मुले यानी काठयाचा धाक दाखविला व गावातील धाडस संघटनेचे सिध्देश्वर यादव, अश्वीनी यादव, कुबेर मंडले व मारुती मंडले सर्व रा. सोनंद ता. सांगोला या सर्वानी हाताने व लाथाबुक्क्यानी आम्हाला मारहाण केलेली आहे. म्हणुन माझी सिध्देश्वर यादव, अश्वीनी यादव, कुबेर मंडले व मारुती मंडले सर्व रा. सोनंद ता. सांगोला, संघटनेचे अध्यक्ष शरद कोळी रा. अर्धनारी ता. मोहोळ, तसेच जिल्हाध्यक्ष प्रदिप जाधव रा. जुनोनी ता. मंगळवेढा आणि त्यांच्या सोबत क्रुजर गाडीतुन आलेले 08 ते 10 लोकांपैकी लक्ष्मण कोळी व परशु कोळी दोघे रा. उमदी ता. जत जि. सांगली तसेच उरलेले 6 ते 8 यांच्याविरुध्द तक्रार आहे.माझा वरील जबाब मी वाचुन पाहीला तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर लिहीलेला आहे.हा फिर्यादी जबाब दिला.   
     अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 
भारतीय दंड संहिता १८६०
१४३
2
भारतीय दंड संहिता १८६०
१४७
3
भारतीय दंड संहिता १८६०
१४८
4
भारतीय दंड संहिता १८६०
१४९
5
भारतीय दंड संहिता १८६०
३२३
6
भारतीय दंड संहिता १८६०
३२४
7
भारतीय दंड संहिता १८६०
३८५
8
भारतीय दंड संहिता १८६०
५०४
9
भारतीय दंड संहिता १८६०
५०६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *