Uncategorized

मगरवाडीत शिस्तीचा आदर्श उपक्रम; विद्यार्थिनींच्या दंडातून शाळेला उपयुक्त साहित्य

मगरवाडी (ता. पंढरपूर) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मगरवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे विद्यार्थिनींनी विनाकारण शाळा बुडवू नये व नियमित उपस्थिती राहावी, या उद्देशाने एक अभिनव व शिस्तीला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत आकारण्यात आलेल्या माफक दंडातून जमा झालेल्या निधीतून शाळेसाठी बॉक्स आरसा व भिंतीवरील घड्याळ खरेदी करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी शिक्षक उमेश उघडे व शिक्षिका सरिता कापसे यांनी केली.

खरेदी करण्यात आलेल्या वस्तू शाळेचे मुख्याध्यापक विकास कांबळे यांच्या हस्ते शाळेला सुपूर्द करण्यात आल्या. विद्यार्थिनींच्याच हितासाठी जमा झालेल्या निधीचा उपयोग करण्यात आल्याने त्यांच्यामध्ये शिस्त, नियमित उपस्थिती, वेळेचे महत्त्व आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होत आहे.

शिस्तीला विधायक दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *