ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात कार्यशाळेचे आयोजन

पंढरपूर प्रतिनिधी:
कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी काँक्रीट मिक्स डिझाईन वरील प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी अल्ट्राटेक सिमेंटचे गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख श्री. वैभव जगताप आणि विक्री व विपणन अधिकारी श्री. सुहास वसेकर यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री. वैभव जगताप आणि श्री. सुहास वसेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रत्यक्ष प्रशिक्षणामध्ये जगताप सरांनी मिक्स डिझाईन बद्दलचे मुलभूत ज्ञान दिले आणि त्याबरोबरच प्रयोगशाळेमध्ये त्याचे प्रात्यक्षिक दाखवताना त्यातील बारकावे आणि उणिवांबद्दल सखोल माहिती दिली.

या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी प्रा. सचिन घाडगे यांनी सुत्रसंचालक म्हणून तसेच डॉ. यशवंत पवार आणि प्रा. अजित करांडे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट डॉ. चेतन पिसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच स्थापत्य यांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *