ताज्याघडामोडी

उद्योजक इरफान आवटे यांची ईलाइट रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड

संभाजीनगर पिंपरी चिंचवड पुणे येथे इलाईट रोटरी क्लब ची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये क्लबच्या अध्यक्षपदी श्री इरफान आवटे यांची अध्यक्ष निवड करण्यात आली पिंपरी इलाईट रोटरी क्लब हा रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 31 31 चा एक भाग आहे या क्लबचा उद्देश सामाजिक आणि व्यावसायिक विकास करणे समुदाय सेवा करणे आणि रोटरीच्या मूल्यांचे पालन करणे हा आहे नूतन अध्यक्ष इरफान आवटे हे उद्योजक असून या अगोदर त्यांनी गरजू लोकांना अनेक वेळा मदत केलेली आहे विशेष त्यांनी कोरोना काळात गव्हर्मेंट हॉस्पिटल व शाळांना फॉगिंग मशीन ची मदत केली आहे गरजू रुग्णांना व गरीब परिस्थितीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदत केली आहे गरजू लोकांना वस्त्र दान, अन्य धान्य दान अशी मदत केली आहे ते नेहमीच अश्या उपक्रमात अग्रेसर असतात. नूतन अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर इरफान आवटे म्हणाले की मीही खूप गरीब घरातून आलेलो असल्याने मीही खूप मला त्याची जाण आहे गरीबी बरोबर माझाही संघर्ष झाला असल्यामुळे मला गरजु लोकांना मदत केल्यामुळे मला मानसीक समाधान मिळते. तर यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष मराठे म्हणाले की नूतन अध्यक्ष श्री इरफान आवटे हे बुद्धिमान अभ्यासू कल्पक आणि संसाधनक्षम असल्याने त्यांचा नक्कीच फायदा नक्कीच गरजु लोकांना होईल व ते त्या पदाला योग्य न्याय देतील असा मला विश्वास आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोटरियन माधव शेंडकर यांनी केले. सचिव पदी अनिल भडुंगे यांची निवड करण्यात आली.यावेळी बोर्ड ऑफ डायरेक्टर चे नूतन सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले स्वागत करण्यात आले. या वेळी सहाय्यक गव्हर्नर रोटरियन प्रणिता आलुरकर ,मयुर शेणडकर , सचिन मोरे, रंजना राणे, संदिप मादाने, अतुल किरनुकरी, स्नेहल अर्जुन वाडकर,मीता ठाकुर, राहुल सोमाणी, चंद्रा पाटील, रविंद्र भावे यांच्या सह, आवटे यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नी सौ शितल आवटे व मुलगा रोटरीचे माजी अध्यक्ष आर्यन आवटे व मित्र परिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *