पंढरपूर दि .5 जुलै विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देश परदेशातून शेकडो पायी चालत आलेल्या भाविक-भक्तांसाठी महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शेकडो मैलाचे अंतर पायी चालून विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविक भक्तांसाठी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री सहायता निधी व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात येत असून यामध्ये विशेषता भावीक, भक्तांच्या आरोग्याची काळजी घेणे हे मुख्य उद्दिष्ट असून यामध्ये मोफत तपासणी व उपचार आरोग्य केंद्रा मार्फत आरोग्य सेवा 102 व 108 रुग्णवाहिका स्त्री रोग तज्ञा मार्फत सेवा, पाणी नमुने तपासणी ,पाण्याच्या स्त्रोताची ओटी टेस्ट करणे, हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना च्या माध्यमातून मोफत सेवा,आपत्कालीन सेवा, वारी मार्गावरील हॉटेल्स व निवासस्थानाच्या स्वयंपाक स्थळाची पाहणी, धूर फवारणी ,सुसज्ज आरोग्य पदके ,चित्ररथामार्फत आरोग्य विषयी जनजागृती ,पालखी मुक्कामाच्या ठिकाणी अति दक्षता केंद्र, हिरकणी कक्ष, औषधी किडचे वाटप, जैव कचरा विल्हेवाट ,आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम, भाविकांची डोळे तपासणी करून मोफत चष्म्याचे ही वाटप करण्यात येते .अशा विविध उपक्रमांनी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असते.
महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या या आरोग्य शिबिराचे सर्व वारकरी भक्ता म्हणून कौतुक होत असून पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे समाधान व दुसऱ्या बाजूला महा शिबिरामुळे मिळणारा दिलासा यामुळे भाविक सुखावल्याचे दिसून येत आहे.





