ताज्याघडामोडी

कडाक्याच्या थंडीत पडणार जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट

देशात थंडीचा लाट आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमान शून्याच्याखाली गेले आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे.राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत देशातील काही शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

संपूर्ण उत्तर भारतात ढगाळ वातावरण असणार आहे आणि पुढील आठवड्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावरही पावसाचे सावट आहे. तसेच लोकांना गोठवणाऱ्या थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. हवामान खात्याचे म्हणणे आहे की वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे उंच डोंगराळ भागातून मैदानी भागाकडे वाहणारे बर्फाचे वारे थांबले आहेत, त्यामुळे या भागात हवामानाच्या तापमानातही किंचित वाढ झाली आहे. 

हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात थंडीचा कालावधी कमी आहे. पण तरी देखील मुंबई, कोकण, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि अहमनगर या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळालं. ही थंडी कमी होण्यासाठी आणखी 5 दिवसांचा कालावधी लागणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *