ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील रोहन देशमुखची ३ साॅफ्टवेअर कंपनी निवड

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेले कुमार रोहन संपत देशमुख यांची ३ साॅफ्टवेअर कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये अगदी माफक फी मध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सेवा-सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. विशेषत: विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखुन त्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव देणेसाठी महाविद्यालयाने “आंतरराष्ट्रीय सिंहगड सोलार व्हेईकल चॅम्पियन” आयोजित करून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोलार व्हेईकल चॅम्पियन शिप आयोजित करणारे महाराष्ट्रातील पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज हे एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयला राष्ट्रीय मुल्यांकन परिषद म्हणजे नॅक समितीकडून ए ग्रेड मिळाला असुन ए ग्रेड मिळविणारे पंढरपूर सिंहगड हे जिल्हातील पहिले इंजिनिअरींग काॅलेज आहे.
अशा या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक व परफेक्ट इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊन आय टी कंपनीत प्लेस होत आहेत.
मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील रोहन संपत देशमुख यांनी काॅग्निझंट वार्षिक पॅकेज-४ लाख, विप्रो वार्षिक पॅकेज-३.५० आणि इन्फोसिस वार्षिक पॅकेज-३.५० आदी तीन कंपनीत कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन मुलाखती दिल्या होत्या. या तिन्ही कंपनीत रोहन देशमुख यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन रोहन देशमुख हे काॅग्निझंट कंपनीत नोकरी करणार आहेत.
विविध आय. टी. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *