पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दाखल
पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या एका इसमास ओळखीचा गैरफायदा घेत एचडीएफसी बँकेच्या लिलावात स्वस्तात वाहने मिळवून देण्याचे आमिष दाखवत २०१६ पासून आतापर्यंत वेळेवेळी रोख व बँकेद्वारे २७ लाख रुपये देऊनही वाहनांची डिलिव्हरी देण्यास नकार दिल्याने व उलट पोलीस केस करण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने पंढरपुरातील दोघांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
तसेच या प्रकरणी पंढरपूर सह माढा तालुक्यातील अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले असून एकूण फसवणुकीचा आकडा ७६ लाख इतका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.