ताज्याघडामोडी

अभिजित पाटील यांनी जाहीर केली उमेदवारांची नावे

पहा श्री विठ्ठल परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांची गटनिहाय नावे  

धाराशिव शुगरचे चेअरमन तथा डीव्हीपी समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलच्या माध्यमातून 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये तुंगत गट – अभिजीत धनंजय पाटील, प्रविण विक्रम कोळेकर, करकंब गट – दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे, नवनाथ अंकुश नाईकनवरे, कालिदास शंकर साळुंखे, कासेगांव गट – सुरेश बाबा भुसे, बाळासाहेब चिंतामणी हाके, प्रेमलता बब्रूवाहन रोंगे, भाळवणी गट – साहेबराव श्रीरंग नागणे, धनंजय उत्तम काळे, कालिदास रघुनाथ पाटील, मेंढापूर गट – दिनक आदिनाथ चव्हाण, जनक माणिक भोसले, सरकोली गट – संभाजी ज्ञानोबा भोसले, सचिन पोपट वाघाटे, अनुसूचित जाती सिताराम तायाप्पा गवळी, इतर मागास वर्ग – अशोक ज्ञानाोबा जाधव, संस्था मतदार संघ राजाराम धोडिंबा सावंत, महिला प्रतिनिधी कलावती महादेव खटके, सविता विठ्ठल रणदिवे, भटक्या विमुक्त जातीमधून सिद्धेश्वर शंकर बंडगर यांचा समावेश आहे.

 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीत येत चालला आहे आणि एक दिवस तो बंद पडणार आहे,त्यामुळे सभासदांनी जागरूक राहून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अर्थकारणाचा अभ्यास करावा,आपल्या हाती वर्षातून एकदा पडणारा वार्षिक अहवाल सभासद या कारखान्यचा मालक आहे हे ओळखून नीट अभ्यासावा पण दक्ष राहून विठ्ठल वाचवा असे आवाहन २०१६ च्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यच्या निवडणुकीत करत विठ्ठल कारखान्यातील सत्ताधाऱ्या विरोधात त्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उतरविणारे व त्या निवडणुकीत एकाकी जुंज देऊनही ६ हजार सभासदांचा विश्वास प्राप्त केलेले डॉक्टर बी पी रोंगे सर यांनी आज महत्वपूर्ण निर्णय घेत अभिजित पाटील प्रणित श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलला आपला पाठींबा जाहीर केला असून या निवडणुकीत कासेगाव गटातून प्रेमलता बब्रूवाहन रोंगे यांना या पॅनलकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *