ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच शाळा पुन्हा एकदा सुरू होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मुलांच्या लसीकरणाचा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र हा प्रश्न लवकरच मिटण्याची शक्यता असून पुढील सहा महिन्यात तीन वर्षांवरील मुलांसाठी लस येणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे.
आगामी सहा महिन्यांमध्ये तीन वर्ष आणि त्यावरील मुलासाठी कोरोना प्रतिबंधक लस लॉन्च केली जाईल, अशी माहिती पुनावाला यांनी दिली आहे. लहान मुलांच्या लसीला मान्यता मिळताच लसीकरणाला सुरुवात होईल.