ताज्याघडामोडी

कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी दक्षिण भागातील गावांना द्या- आ समाधान आवताडे आ आवताडे यांच्या मागणीवर कृष्णा-खोरे महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद

प्रतिनिधी- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे कृष्णा नदीतील वाहून जात असलेले पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील १९ गावांना देण्याची मागणी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सदर मागणी करत असताना आमदार आवताडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या आर्या आराध्ये यांची २ कंपनीत निवड

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली पंढरपूर येथील आर्या अमर आराध्ये हिची दोन नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली. एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कुमारी आर्या अमर आराध्ये हिने वरली […]

ताज्याघडामोडी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस पंढरपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करणार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी दिली माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या 65 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संकल्पनेतून ” अजित वनराई ” या माध्यमातून पंढरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील पटवर्धनकुरोली, भाळवणी, गादेगांव, चळे या प्रमुख […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर – आ समाधान आवताडे

मंगळवेढा (प्रतिनिधी)- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील खराब रस्त्यांसाठीच्या कामासाठी एकूण ५६ कोटी रुपये एवढ्या निधीला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे खराब झालेले रस्ते दर्जोन्नती होऊन दळणवळणास अधिक चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. मंजूर झालेले रस्ते आणि मिळालेला निधी पुढीलप्रमाणे – मंगळवेढा ते […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज  कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील  मेकॅनिकल इंजिनिअरींग या विभागाच्या वतीने  आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) अर्थात परिणाम-आधारित शिक्षण २०२४ मध्ये गुणवत्ता हमीसाठी ‘औद्योगिक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावर एक आठवड्याचा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न झाला.        स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ जून २०२४ ते दि.२४ जून २०२४ दरम्यान ‘अध्यापन आणि शिक्षण प्रक्रियेत […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या विजय ताकभाते यांची ‘फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत निवड मिळाले वार्षिक रु. ५.४६ लाखांचे पॅकेज

पंढरपूरः ‘फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन  इंजिनिअरिंग या  विभागातील विजय दीपक ताकभाते यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.      पुणे येथील ‘फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या अक्षय नागणे यांची ३ कंपनी निवड

पंढरपूर: प्रतिनिधी एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले आधंळगाव (ता. मंगळवेढा) येथील अक्षय सुनिल नागणे यांची ३ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोदकुमार मोरे यांनी दिली. कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण […]

ताज्याघडामोडी

पंढरीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या मातोश्री स्व.गंगुबाई शिंदे यांच्या नावे अन्नछत्र,दोन दिवस भाविकांना अन्नदान उद्योजक राजू खरे यांचे वतीने राबविण्यात आला विधायक उपक्रम

पंढरपूर /प्रतिनिधी मोहोळ विधानसभा मतदार संघांचे उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी राज्याचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ आषाढी वारीतील भाविकांना मोफत अन्नछत्र उघडले होते . याचे उदघाटन शिवसेनेचे मुख्य पक्षप्रतोद आ. भरतशेठ गोगावले यांचे हस्ते करण्यात आले. आषाढी एकादशी दिवशी दिवसभर मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश!

अजित पवार गटाला दोन तर शरद पवार गटाला एका आठवड्याची मुदत नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  फूट पडून एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप खरी राष्ट्रवादी कोणाची यावर सर्वोच्च निकाल आलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने  बहुमताच्या जोरावर अजित पवार गटाला  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मूळ नाव आणि ‘घड्याळ’ हे चिन्ह बहाल केलं. तर […]

ताज्याघडामोडी

कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण! मनसे म्हणते, ‘महाराष्ट्रात असे कायदे आहेत मात्र…’

महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य असलेल्या कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. येथील सरकारने स्थानिकांना क आणि ड वर्गातील नोकऱ्यांमध्ये 100 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर केलं आहे. तसेच व्यवस्थापकीय नोकऱ्यांमध्ये 50 टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यात याव्यात याशिवाय गैरव्यवस्थापकीय नोकऱ्यांमधील 75 टक्के नोकऱ्या स्थानिकांसाठी राखीव असतील असं नव्या कायद्यानुसार अनिवार्य करण्यात आलं आहे. सरकारी सवलतींचा लाभ […]