ताज्याघडामोडी

पळशी येथे किरणा दुकानदारावर अन्न विभागाची कारवाई

पळशी येथे किरणा दुकानदारावर अन्न विभागाची कारवाई

प्रतिबंधित गुटख्याचा साठा ताब्यात घेऊन गुन्हा दाखल 

अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईत पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील मे. विभूते किराणा व जनरल स्टोअर्स, पळशी, ता. पंढरपूर या ठिकाणी आकस्मातपणे भेट देत केलेल्या तपासणीत सदर दुकानात विमल या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा करून ठेवल्याचे उघड झाले असून या प्रकरणी सदर किरणा दुकानदार लक्ष्मण निवृत्ती विभूते याच्या विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने ८४०० रुपयांचा विमल नामक गुटखा ताब्यात घेतला आहे.
पंढरपूर शहर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचे सातत्याने दिसून आहे.मात्र गेल्या काही महिन्यात अन्न विभागाच्या कारवाया मात्र थंडावल्या होत्या.अशातच लाखभर लोकसंख्या असलेले पंढरपूर शहर व त्याहीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत असल्याचे वेळोवेली निदर्शनास आले असतानाही अन्न सुरक्षा अधिकारी यांना अपुऱ्या मनुष्यबळावर विविध तालुक्यात कारवाया कराव्या लागत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळेच पंढरपूर येथे अन्न विभागाचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करून त्याठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *