ताज्याघडामोडी

स्वेरीच्या प्रा. मिनल भोरे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

पंढरपूर – पुणे येथील ए.आय.एस.एस.एम.एस. व्यवस्थापन संस्थेमध्ये स्वेरीच्या एमबीए विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. मिनल मारुती भोरे यांनी पुणे जिल्ह्यातील फास्ट मूव्हिंग हेल्थ गुड्स (एफ.एम.एच.जी.) कंपन्यांनी अवलंबलेल्या विपणन रणनीतींचा अभ्यास‘ या विषयावर शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असणारी पीएच. डी. पदवी संपादन केली असून  या यशाबद्दल  त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

          स्वेरीच्या प्रा. मिनल भोरे यांना ए.आय.एस.एस.एम.एस. या व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. अभिजित आर. मंचरकर यांनी मुख्य मार्गदर्शन केले आहे. डॉ. मिनल भोरे यांचे संशोधन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतून करण्यात आले असून त्यांचा विपणन व्यवस्थापन‘ हा मुख्य विषय होता. सध्या डॉ. मिनल भोरे ह्या गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एम.बी.ए विभागात गेल्या १५ वर्षांपासुन प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. डॉ. मिनल भोरे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा जवळपास ३५ परिषदांमध्ये सहभाग घेवून आपले शोध पेपर सादर केले आहेत. तसेच ५ पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे फास्ट मूव्हिंग हेल्थ गुड्स‘ कंपन्यांना विपणन‘ क्षेत्रात नवीन दृष्टिकोन आणि धोरणांची माहिती मिळेल आणि या क्षेत्रातील व्यवसायांना नवीन दिशा मिळणार आहे. डॉ. भोरे यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे देखील सहकार्य लाभले आहे. प्रा. मिनल भोरे यांनी पीएच.डी. प्राप्त केल्याबद्धल त्यांचा स्वेरीतर्फे अॅड. धनश्री किरण घाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगेस्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेखविश्वस्त व पदाधिकारीअभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवारस्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळबी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियारडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवेसर्व अधिष्ठाताप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्धल डॉ. मिनल भोरे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *