हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विरोधक एका बाजूला सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी करत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे य़ांची एसआयटी चौकशी होण्याची शक्यता आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्य सरकार एसआयटीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
भाजप नेत्यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यासह निकटवर्तीयांवर याआधीही आरोप केले आहेत. नारायण राणे, नितेश राणी यांनी गंभीर आरोप केले होते. आता आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाऊ शकते असं सूत्रांनी म्हटलं आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली होईल. ऐन अधिवेशन काळातच हा मुद्दा समोर आल्याने सभागृहातही यावरून गोंधळ होऊ शकतो. एसआयटीने दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना चौकशीला बोलावल्यास त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.