ताज्याघडामोडी

कोणत्याही मंत्रालयाची बैठक घेण्याचा अजित पवारांना अधिकार – प्रफुल्ल पटेल

अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहेत. त्यामुळे कोणत्याही विभागाच्या बैठका घेऊन माहिती घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.आज भारतासाठी आनंदाचा क्षण आहे. चंद्रयान 3 चे चंद्रावर लँडिंग होत आहे. भारतासाठी आज गौरवाचा, अभिमानाचा दिवस आहे. भारताची प्रतिभा किती शक्तिशाली आहे, हे आज सगळ्या जगाला दिसेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते.

कांद्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पन्न घेतलं जातं. सरकारने निर्यातदर वाढवला असून केंद्र सरकारने तब्बल २ लाख टन कांदा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. कांद्याला ऐतिहासिक भाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गरज भासल्यास केंद्र सरकारने आणखी कांदा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे, असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रगती झाली आहे. ते जर सप्टेंबरमध्ये हे सरकार पडणार आहे असे म्हणत असतील तर त्यावर मला पाणी फेरायचे नाही. सगळ्यांना शुभेच्छा देत प्रफुल्ल पटेल यांनी टोला लावला आहे. महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्षात चांगला समन्वय आहे. प्रत्येक गोष्टीवर एकमेकांशी संवाद करून आम्ही निर्णय घेत असतो. यात उगाच वादावादी लावायचा कोणी प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे. त्यात तथ्य नाही, असे देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *