ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य विभागातील माजी विद्यार्थ्यासोबत थेट संवाद

एस. के. एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग येथे महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने माजी विद्यार्थ्यांसह थेट संवाद सत्र आयोजित करण्यात आले, हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अभियंता आकाश वसेकर उपस्थित हे होते. आकाश वसेकर यांनी २०२१ मध्ये सिंहगड महाविद्यालयातून बीटेक डिग्री मिळवली असून ते सध्या कॉग्निझंट कंपनीमध्ये प्रोग्रॅमर तज्ञ या पदावर कार्यरत आहेत.

या कार्यक्रमांमध्ये अभियंता आकाश वसेकर यांनी महाविद्यालय शैक्षणिक जीवनातील अनुभव सांगितले तसेच या कार्यक्रमांमध्ये त्यांनी द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इंटरव्यू आणि रिज्यूमे बनवण्यासाठी मार्गदर्शन केले.

निवड प्रक्रियेमध्ये अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे आणि योग्य नियोजन केल्यास निवड प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींवर तुम्ही कशा प्रकारे मात करून यश प्राप्त करू शकाल याविषयी मत अभियंता आकाश वसेकर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. रोहित गायकवाड यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालय, हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिंण प्रगतीसाठी ऑनलाइन पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे, या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *