गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सुटाबुटात लग्नात आलेला पाहुणा १० लाख घेऊन पसार

सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहेत. तसेच चोरांनीही चोरीसाठी अनोख्या पद्धती आजमावण्यास सुरुवात केली आहे. अशीच अनोख्या चोरीची घटना मध्य प्रदेशातील कटनीमधील एका मॅरेज गार्डनमध्ये आयोजित एका विवाह समारंभात घडली आहे.

या अनोख्या चोरीची सध्या सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.

कटनीमध्ये मॅरेज गार्डनमध्ये एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यातील तिलक विधासाठी सुटाबुटात एक पाहुणा आला. तो त्या विधीमध्ये सहभागीही झाला. उपस्थितांपैकी कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. मात्र, सर्व उपस्थित विधीमध्ये गुतंल्याचे पाहत त्याने संधी साधली आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख 5 लाख रुपये लांबवत पोबारा केला.

उपस्थितांना या चोरीबाबत समजताच त्यांना एनकेजे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ही घटना सीसीटीव्हीमध्य कैद झाली आहे. सुटाबुटात पाहुणा म्हणून आलेल्या व्यक्तीनेच ही चोरी केल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. सर्व उपस्थित विधीमध्ये गुंतल्याचे पाहून त्या सुटाबुटातील पाहुण्याने संधी साधत एका दरवाज्यावर लाथ मारली. तो दरवाज उघडल्यावर त्याने तेथील दागिने आणि 5 लाखांची रोकड लांबवत पोबारा केला.

उपस्थितांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. विधी पूर्ण झाल्यावर आम्ही आमच्या खोलीत आलो. तेव्हा 5 लाख रुपयांची रोकड, सोन्याचे जानवे. चांदीची थाळी, चांदीची मासळी याची चोरट्याने चोरी केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याची माहिती मिळाली आहे.

सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत. तसेच या विधीचे फोटोग्राफही पोलीस तपासत आहेत. सुटाबुटातील या व्यक्तीला वधू किंवा वर पक्षाकडील कोणीही ओळखत नसल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *