ताज्याघडामोडी

वाळूच्या कारणातून दोन गटात झालेल्या हाणामारीत डबल मर्डर

माण तालुक्यातील नरवणे येथे बुधवारी वाळूच्या कारणातून बुधवारी दोन गट आपसात भिडले यावेळी झालेल्या तुफान हाणामारीत दोघांचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

माण तालुक्यातील नरवणे येथे आज सकाळी ही घटना घडली. तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाळुचा लिलाव घेतला होता. हा लिलाव मयत चंद्रकांत जाधव यांना मिळाला होता. याचा राग जाधव यांच्या भावकीतील लोकांना होता. आज सकाळी याच कारणावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

चंद्रकांत नाथा जाधव आणि विलास धोंडिबा जाधव अशी मारहाणीत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत आणखी तीन गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे नरवणे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस तैनात करण्यात आले असून, माणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

18 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago