ताज्याघडामोडी

कोरोना काळात हॉस्पटिलनी रुग्णांना आकारलेल्या बिलांचे ऑडिट करण्याची विधानसभेत मागणी

करोनाकाळात मुंबईपासून गावापर्यंत बेडसाठी दरनिश्‍चिती केली. एका साध्या बेडला चार हजार रुपये, ऑक्‍सिजन बेडला साडेसात हजार रुपये आणि व्हेंटीलेटर बेडला साडेनऊ हजार रुपये अशा प्रकारची दरनिश्‍चिती केली गेली. त्याचा काय आधार होता हे आजपर्यंत समजले नसल्याचे त्यांनी सांगितले. काही डॉक्‍टरानी चांगले काम केले; परंतु ग्रामीण भागामध्ये काही मंडळींनी लूटण्याचा कार्यक्रम केला आणि चार हजार, साडेसात हजार दर हा साध्या बेडला व ऑक्‍सिजन बेडला घेण्याची मुभा देऊन लोकांची लुबाडणूक करण्याची योजना राज्य शासनाने करोनाच्या कालावधीमध्ये राबवली.एका पेशंटला तीन ते पाच पीपीई किट वापरले गेले. औषधांचा हिशोब कोणालाच शेवटपर्यंत लागला नाही. ऑडिट करण्यासंदर्भात चर्चा फक्त कागदावरच राहिली आणि ग्रामीण भागातील गोंधळलेल्या लोकांना भीती दाखवून लुटण्याचा कार्यक्रम करोनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रुग्णालयांनी केला आणि त्याच्यावर कोठल्याही प्रकारचे नियंत्रण राज्य शासनाला, आरोग्य, महसूल विभागाला ठेवता आले नाही.ज्या रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजना होती त्या ठिकाणी ती राबवली गेली असती तर लोकांना खूप मोठा फायदा झाला असता; परंतु ती कुठेच राबवली गेली नाही. या चर्चेच्या निमिताने या सर्वांचे ऑडिट करण्यासंदर्भात पुनर्निर्देश राज्यशासनाने द्यावेत, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली आहे.विधानसभा सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करताना ते बोलत होते

करोना काळामध्ये जे काही आरोग्य विभागाचे साहित्य रेट कॉन्ट्रॅक्‍टच्या माध्यमातून खरेदी केले गेले. रेट कॉन्ट्रॅक्‍ट हा संभ्रमाचा व संशयचा विषय आहे. या माध्यमातून केलेली खरेदी ही पुन्हा एकदा तपासण्याची आवश्‍यकता आहे. त्यामध्ये काही चुकीचे आढळले तर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला तर खूप मोठी लूट उघड होऊ शकेल, अशा प्रकारची मागणी त्यांनी यावेळी केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago