ताज्याघडामोडी

आंबे येथे जेसीबीच्या साहाय्याने होत असलेल्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील आंबे येथून जेसीबीच्या साहाय्याने भरदिवसा अवैध वाळू उपसा करून नदीकाठच्या शेतजमिनीत साठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत  MH 13 AJ 5704 या जेसीबीसह शेतामध्ये साठा केलेला वाळू साठा असा २२ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.तर या प्रकरणी जेसीबी चालक राजू दत्तात्रय वालेकर वय. 22 वर्ष रा. दसूर ता. इंडी जि. विजापूर राज्य कर्नाटक , सध्या आंबे ता. पंढरपूर व शेतमालक व जेसिबी मालक हरि शिवाजी शिंदे रा. आंबे ता.पंढरपूर यांच्या विरुद्ध भा.द.वि. 379,34 सह गौण खनिज कायदा1978 चे कलम 4(1),4(क)(1) व 21 प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          या बाबत पो.ना.विक्रम चांगदेव काळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे आंबे ता.पंढरपूर शिवारातील भिमा नदीचे पात्रालगत शेत जमीन आसणारे हरि शिवाजी शिंदे यांचे शेताजवळील भिमा नदीपात्रातून जेसीबी च्या साहाय्याने वाळुचा अवैध उपसा करून ती वाळू शेतामध्ये साठवण करत आहेत. मंगळवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी 09/30वा.चे सुमारास फिर्यादीसह पो.हे.काँ.चवरे,पो.ना.ताटे ,पो.काँ.बाबर हे घटनास्थळी गेले असता तेथे फिर्यादीत नमूद वरील दोन आरोपी हे जेसीबी च्या साहाय्याने भिमा नदी पात्रातुन अवैध वाळुचा उपसा करून ती लगत असलेल्या शेतामध्ये साठवण करत असल्याचे दिसले असता तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

16 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago