ताज्याघडामोडी

नियमबाह्य साखर विक्री करणाऱ्या साखर कारखान्यांवर गुन्हा दाखल होणार

देशांतर्गत बाजारपेठेत किमान विक्री दरापेक्षा कमी दराने साखरविक्री करू नये तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कारखान्याच्या दरमहा साखर विक्री कोटा आणि साखर साठा या दोन्ही मर्यादांचे उल्लंघन करण्यात येऊ नये, अशा सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार साखर कारखान्यांनी दरमहा साखरेची विक्री स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना साखर आयुक्‍तांनी दिल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा सर्व साखर कारखान्यांना दिला आहे.

देशांगर्तग अतिरिक्‍त झालेल्या साखरेच्या उत्पादनाचे व्यवस्थापन व्हावे, साखरेची किंमत देशांतर्गत बाजारपेठेत स्थिर व्हावी. तसेच, ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे कारखान्यांकडून दर मिळावा याकरिता केंद्र शासनाने शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार साखर विक्रीची किमान आधारभूत किंमत 3100 रुपये प्रति क्विंटल निश्‍चित केली आहे.तसेच, बाजारातील साखरेची मागणी, पुरवठ्यातील समतोल साधण्याकरिता खुल्या बाजारात प्रत्येक कारखान्याने किती साखर विक्री करावी यासाठीचा साखर विक्रीचा दरमहा कोटा कारखान्यांना ठरवून दिलेला आहे.

केंद्र शासनाच्या सर्व बाबींची अंमलबजावणी न करणे म्हणजे शासनाच्या साखरेचे दर स्थिर ठेवण्याच्या धोरणाचे उल्लंघन आहे. तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक साखर विक्री केली जाणार नाही, याची पुरेपुर काळजी घ्यावी, या सूचनांचे साखर कारखान्यांनी पालन न केल्यास संबंधीत कारखान्यांवर कारवाई केली जाईल आणि याबाबतचा अहवाल केंद्र शासनास सादर केला जाणार आहे, असे साखर आयुक्‍तांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

20 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago