निविदा सूचना

पंढरपुरात भेसळयुक्त दूध घेऊन येणाऱ्या टेम्पोवर अन्न विभागाची कारवाई

०३/०२/२०२१ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी  प्रशांत कुचेकर यांना सांगली जिल्ह्यातून एक निळ्या रंगाचा आयशर टेम्पो क्रमानं एम एच ०९ सी यू ०००७ भेसळ केलेले दूध घेऊन पंढरपूर येथे येणार असल्याच्या प्राप्त गोपनीय माहिती नुसार मे. साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर ली या पेढीची तपासणी केली. सदर पेढी गोपनीय माहितीनुसार सदर भेसळीचे दूध स्वीकारत असल्याचे दिसून आले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कारवाई वेळी सादर पेढीत संशयित भेसळीचे अंदाजे १०० लिटर दूध स्वीकारल्याचे व टेम्पोत संशयित भेसळीचे अंदाजे १८८० लिटर उपलब्ध होते. सदर संशयित भेसळीच्या दोन्ही दुधाचे नमुने विश्लेषणाकरिता घेऊन उर्वरित साठा जन आरोग्याचा विचार करिता जागेवर नष्ट करण्यात आला. अधिक तपासणी केली असता साबरकांथा पेढीत अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक तंत्रज्ञ नसल्याचे तसेच पेढी विनापरवाना असल्याचे दिसून आलेने पेढीस जागेवर व्यवसाय थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी  प्रशांत श. कुचेकर यांनी सहकारी अन्न सुरक्षा आधिकरी योगेश देशमुख यांचे समवेत सहाय्यक आयुक्त (अन्न) प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त श्री. शिवाजी देसाई यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago