गुन्हे विश्व

ट्रॅफिकमध्ये पिस्तुलीचा धाक दाखवणारे शिवसैनिक नाही

मुंबई, 31 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहतू कोंडीदरम्यान  मार्ग काढण्यासाठी एका बहाद्दराने इतर वाहनचालकांना चक्क रिव्हॉल्व्हरची भीती दाखवली होती. या प्रकरणी अखेर दोघांना अटक करण्यात आली आहे. परंतु, पिस्तुल दाखवणारे हे शिवसैनिक नव्हते, चुकीच्या पद्धतीने शिवसेनेवर टीका करण्यात आली, असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केला आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील एक व्हिडीओ ट्वीट केला होता. यात एका कारमधील तरुण पिस्तुलीचा धाक दाखवून जात होते. गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यामुळे जलील यांनी शिवसेनेवर आरोप केला होता. परंतु, त्यांच्या या आरोपाला राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी उत्तर दिले आहे.मुंबई पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात वाहतुकोंडी असल्याने वाहतुकोंडीतून मार्ग काढण्यासाठी समोरील वाहनचालकांना रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढत असल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली होती.

या प्रकरणात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक कार चालक आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती भर रस्त्यात वाहनांच्या गर्दीत रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहे. खोपोली पोलिसांनी तातडीने तपास करीत कार नंबरच्या आधारे अटक करून कारमधील प्रवाशांना खोपोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago