पंढरीतील महावीर नगर येथील व्यापाऱ्याच्या घरी मोठी चोरी

पंढरपूर शहर तालुक्यात गेल्या काही दिवसात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याची चर्चा होत असतानाच पंढरपूर शहरातील मध्यवर्ती व वर्दळीचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महावीर नगर येथील फर्निचर साहित्याचे व्यापारी अजित फडे यांच्या घरी चोरीची घटना घडल्याचे उघडकीस आले असून चोरटयांनी अजित फडे यांच्या घरातून दागिने,रोख रकमेसह १५ लाख ७० हजारांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद सजीवनी अजित फडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
          या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि,अजित ताराचंद फडे यांचे महावीर नगर येथे फर्निचर विक्रीचे शोरूम असून याच ठकाणी ते आपल्या कुटुंबासह राहण्यास आहेत.09/12/2020रोजी फिर्यादी व त्यांचे पती अजित हे मुलगी मधुरिमा हिस पुणे येथे सोडण्याकरीता गेले होते. दि.13/12/2020रोजी सायंकाळी 05/30वाचे सुमारास ते पुण्याहुन मुलीला सोडुन परत घरी आलो.घराचे दाराचे कुलुप काढुन दरवाजा उघडुन घरात प्रवेश केल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवलेला पाणी पिण्याचा चांदीचा जार घेण्यास गेले असता तो त्याठिकाणी मिळुन आला नाही.तेव्हा मी तो शोधला असता तो घरामध्ये मिळुन आला नाही.त्यावेळी कपाटातील इतर साहित्य पाहिले असता तेथे ठेवलेले चांदिची भांडी त्याठिकाणी दिसुन आली नाहित. घरात इतर ठिकाणी ठेवलेले सोन्याचे व चांदिचे दागिने तसेच रोख रक्कम तपासुन पाहिली असता ती ठेवलेल्या ठिकाणी मिळुन आली नाही.
          .01/12/2020 ते दि.13/12/2020 दरम्यान अज्ञात चोरट्याने नजर चुकवुन उघड्या घरात प्रवेश करुन बेडच्या कप्प्यात ठेवलेले सोन्या चांदिचे दागिने, पैसे व घरात इतरत्र वापरात असलेले इतर साहित्य, असा एकुण 15,70,000/- रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद संजीवनी अजित फडे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

18 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago