Categories: Uncategorized

जिवा-सेना संघटनेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याचे सुपूत्र राहुल चव्हाण यांचा सत्कार

जिवा-सेना संघटनेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याचे सुपूत्र राहुल चव्हाण यांचा सत्कार

पंढरपूर (प्रतिनिधी) :-  जिवा-सेना संघटनेच्या वतीने देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यु.पी.एस.सी.) परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केलेले पंढरपूर तालुक्याच्या खर्डी या गावचे सुपूत्र राहुल अनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. दि. 6/8/2020 रोजी खर्डी येथील राहुल चव्हाण यांच्या राहते घरी जाऊन जिवा-सेना संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण, पंढरपूर शहर उपाध्यक्ष संदीप गोरे, पंढरपूर शहर सचिव महेश गोरे, पंढरपूर उपकार्याध्यक्ष किरण हिल्लाळ, पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष दत्तात्रय भुसे व पंढरपूर शहर संपर्क प्रमुख शुभम भोसले यांनी श्रीविठ्ठलाची मुर्ती, शाल, पेन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.

जिवा-सेना संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष कमलाकार (माऊली) चव्हाण यांनी राहुल चव्हाण यांच्या यशाचे कौतुक करत ग्रामीण भागातील युवकांनी अशाप्रकारे यश संपादन करणे कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करुन राहुल चव्हाण यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष समाधान हिल्लाळ, खर्डी येथील रोहित हिल्लाळ, अप्पा वाघमारे, संतोष चव्हाण, विनायक हिल्लाळ,  जिवा सेना संघटनेचे पंढरपूर शहर उपसचिव राहुल क्षिरसागर आदी उपस्थित होते.
देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये खर्डी तालुका पंढरपूर येथील राहुल अनिल चव्हाण यांनी 109 वा क्रमांक मिळवून पंढरपूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आई-वडील शेतकरी असताना देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला.
राहुल यांचे प्राथमिक शिक्षण निकमवस्ती खर्डी तर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण सिताराम महाराज विद्यालय खर्डी आणि सातवी ते दहावी कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शेतकरी कुटुंबातील राहुल लक्ष्मण चव्हाण यांनी दुसर्‍या प्रयत्नात 109 वी रॅँक घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. राहुल चव्हाण यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होताना आढळत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago