महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर आणि कृषिअधिकाऱ्यावर कारवाई करा

महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर आणि कृषिअधिकाऱ्यावर कारवाई करा 

बळीराजा शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी 

पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका,केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ द्या, किसान क्रेडिट कार्ड,पशुधन खरेदी कर्ज याबाबत चौकशीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना देण्यात अपमानास्पद वागणूक देण्याऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक व कृषी अधिकारी झिरपे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

    या बाबत अधिक माहिती देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष माउली हळणवर म्हणाले कि ,राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे चालू पीककर्ज थकीत आहे त्यांना नव्याने पीककर्ज देण्यात यावे असे आदेश दिले आहेत असे असताना काही बँकाकडून वनटाईम सेटलमेंट केलेल्या कर्जदारांचे सिबिल खराब असल्याचे सांगत आहेत. तर विभक्त कुटुंब असताना व स्वतंत्र सातबारा असतानाही रक्ताचे नाते असल्याचे कारण दाखवत पीक कर्जे व विविध योजनांतर्गत कर्जे नाकारली जात आहेत.तरी या बँकाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

      जनहित शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलवडे,बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्य्क्ष माउली जवळेकर,जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले, सचिन आटकले,सचिन शिंदे,दत्ता माने,बंडू माने आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

6 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago