अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली ‘त्या’ तक्रारीची दखल ?
सरकोली येथे महसूल प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासकडून दुर्लक्षित अवैध वाळू उपशावर कारवाई
जिल्हा पोलीस पथकाने जेसीबीसह वाहने घेतली ताब्यात
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथून रात्रंदिवस बिनधास्तपणे वाळू उपसा केला जात आहे मात्र त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे अथवा महसूल प्रशासनाकडे तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही,उलट तक्रारदारासच कुठे वाळू उपसा सुरु आहे ते दाखवा असा तगादा लावला जातो तरी जिल्हा पोलीस प्रमुखांनी या बाबत ठिकाणी सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करावी अशी तक्रार चारच दिवसापूर्वी सरकोलीचे माजी सरपंच पांडुरंग भोसले यांनी केली होती. अशीच तक्रार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडेही केली होती.
सदर अवैध वाळू उपशास पाठीशी घालणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावरही कारवाई करावी अशी तक्रारही केली होती.मात्र जिल्हा पोलीस प्रमुख यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत थेट विशेष पथक पाठवून सरकोली येथून मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई केली असल्याचे विश्वासनिय सूत्रांकडून समजते.या कारवाईत जेसीबी सह वाहने ताब्यात घेतली असून या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध वाळू उपशास जबाबदार असणाऱ्या व तकार करूनही टाळाटाळ करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर आता महसूल प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न पांडुरंग भोसले यांनी उपस्थति केला जात आहे
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…