ताज्याघडामोडी

सोलापूर : भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य देण्याचे शिवधनुष्य आ.आवताडे पेलणार ?

२०१९ च्या तिरंगी लढतीत सुशीलकुमार शिंदेंना मिळाले होते  ६ हजार १९६ मताधिक्य

भाजपचा ‘उपरा’ तर ‘वंचित’ चा नवखा उमेदवार या जनभावनेचा फटका नक्की कुणाला बसणार ? 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातुन सोलापूर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत  होती.आणि त्यामागे कारणेही तशीच होती.भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर भाजपचे नवख्या असलेल्या जयसिद्धेश्वर स्वामी याना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी टाकली होती.या निवडणुकीत कॉग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  उमेदवार होते आणि कॉग्रेसचे आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांच्यावर सुशीलकुमार शिंदे यांना मताधिक्य देण्याची जबाबदारी पक्षाने सोपविली होती.२०१९ लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघात आणखी एक प्रवाह मोठ्या आक्रमपणे व्यक्त होताना दिसून येत होते.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रथमच सोलापूर लोकसभा निवडणूक लढवीत होते आणि आपले एक मत बाबासाहेबांच्या नातवाला देण्याची हि तर संधी चालून आली आहे अशीच भावना मागासवर्गीय मतदार व्यक्त करताना दिसून येत होते.यातूनच पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजप -कॉग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जोरदार चुरस पहावयास मिळाली.आणि २०१९ च्या निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून कॉग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना ८४ हजार १३५ तर भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांना ७७ हजार ९३९ तर वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना २९ हजार ३२३ इतकी मते मिळाली होती.

    त्यावेळी राज्यात महायुतीचे सरकार असताना आणि देशात मोदी लाट असतानाही पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षास मताधिक्य मिळाले नव्हते.यात पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गटाने मोठी भूमिका बजावत सुशीलकुमार शिंदे यांना २ हजार ६१० इतके मताधिक्य दिले होते तर गादेगाव गटातून देखील शिंदे यांना जवळपास २ हजार इतके मताधिक्य मिळाले होते.               

   आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसकडून प्रणिती शिंदे या उमेदवार आहेत तर भाजपकडून यावेळी स्थानिक उमेदवार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड हे मैदानात उतरणार आहेत. राहुल गायकवाड हे मागील सोलापूर लोकसभा निवडणुकीत उतरलेले प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा तुलनेने नवखे आहेत आणि मागील वेळी मतविभागणी मुळे भाजपचा फायदा झाला अशी धारणा असलेला मतदार यावेळी वेगळी भूमिका घेऊ शकतो.त्यामुळेच यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा क्षेत्रांत कॉग्रेसकडे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या सारखा आक्रमक चेहरा नसला तरी मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारकडून फसवणूक झाल्याची भावना असलेला काही मराठा मतदार,अबकी बार ४०० पार चा नारा देणारे भाजपवाले घटना बदलणार अशी भाजप विरोधकांकडून उठलेली आवई आणि अशातच पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात भाजपचे बुथ वॉरियर्स आमदार आवताडेंचे आणि पंढरपूर शहर तालुक्यात भाजपच्या परिचारक समर्थकांत आमदार आवताडे यांच्या कार्यपध्दतीबद्दल असलेली नाराजी,कॉग्रेसने २०२४ च्या उमेदवारीचा शब्द दिल्यास भगीरथ भालके सर्मथक यांनी कॉग्रेसला सहकार्य करण्याची तयारी दाखविल्याची चर्चा,कॉग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची सोलापूरची लेक अशी प्रतिमा,आक्रमकपणे त्या करीत असलेली टीका.पंढरपुर-मोहोळ मतदार संघात मोहिते पाटील यांना मानणारा वैयक्तिक मतदार वर्ग,मांडवे येथील आमदार राम सातपुते यांच्या आभार सत्कार सोहळ्यात स्टेजच्या मागील बॅनरवर मोहिते पाटील यांना वगळून केवळ कमळाचा फोटो,मोहिते पाटील यांची संभाव्य भाजपा विरोधातील बंडखोरी अशा अनेक बाबी विचारात घेतल्या तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघ वाटतो तेव्हडा सोपा नाही असेच निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवताना दिसून येत आहेत.

     अशातच भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी निधीच्या मंजुरीच्या माध्यमातुन जनता समाधानी आहे असा केलेला समज आणि याच वेळी पंढरपूर शहरातील जनतेच्या मूलभूत प्रश्ना बाबत आमदार आवताडे हे बोटचेपी भूमिका घेत निधी मंजुरीत समाधान मानत असल्याची भावना हे सारे पाहता भाजपचे रामभाऊ सातपुते यांना पंढरपुर-मंगळवेढा मतदार संघ मताधिक्य मिळविण्यासाठी वाटतो तेवढा सोपा नाही असेही निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवित आहेत.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago