ताज्याघडामोडी

फोनवर बोलत बोलत मुलगा घराबाहेर गेला, दोन दिवस शोधाशोध, मात्र नंतर जे घडलं ते पाहून सगळचे हादरले

अबंड शहरातील भालगाव रोड फकरबाद नाल्याजवळ काल ३ जानेवारी रोजी दुपारी १९ वर्षीय नारायण लिबांजी बाबर या तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. नारायण बाबर हा २ जानेवारी पासून बेपत्ता झाला होता‌. नारायण शिंदे नगर भागातील त्याच्या घरी असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास नारायणच्या मोबाईलवर एक कॉल आला होता. नारायणने तो कॉल उचलला आणि बोलत बाहेर निघाला तो परत घरी आलाच नाही.

बराच वेळ झाला तरी नारायण घरी न आल्याने घरच्यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मोबाईल बंद दाखवत होता. दरम्यान २ जानेवारीला संध्याकाळी पाच वाजेच्या जवळपास नारायणचा मोबाईल बंद होऊन संपर्क होतच नसल्याने घरचे काळजीत पडले होते. अखेर त्यांनी अबंड पोलीस स्टेशन गाठत पोलीस स्टेशनमध्ये नारायण बेपत्ता असल्याची नोंद केली होती. नातेवाईक आणि घरच्यांनी त्याचा शोध घेणे सुरूच ठेवले. मित्रांना विचारपूस केली परंतु यश मिळाले नाही. काल दुपारी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या फकरबाद नाल्याजवळ नारायणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

मात्र हा घातपाताचा प्रकार असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करावा यासाठी नातेवाईकांनी नारायणचा मृतदेह रुग्णवाहिकेत टाकू थेट अबंड पोलीस ठाण्यात आणला. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह अबंड पोलीस ठाण्यासमोरुन घेऊन जाणार नाही. तसेच अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली. या प्रकरणी अबंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू झाली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago