ताज्याघडामोडी

राज्यात पावसाची शक्यता, पुढचे २४ तास धोक्याचे; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात आता मे महिनादेखील अवकाळी पावसाचा असेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज पहाटेपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. कारण, या वेळेक अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई आणि उपगरांसह, पुणे, कोकण, गोव्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक शहरांमध्ये सोसाट्याचा वाराही सुटला आहे. दरम्यान, पुणे आणि आसपासच्या परिसरात आज गारा पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि योग्य ठिकाणी धान्याची विल्हेवाट लावावी अशा सूचना देण्यात आला आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज विदर्भातही धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अधिक माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढचे २ दिवस तर विदर्भामध्ये पुढचे ३ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सध्या कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

राज्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगावमध्ये तुफान पाऊस झाला असून पुढचे काही दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढचे २४ तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

3 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 week ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago