ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे १३-१४ आमदार आमच्याकडे येणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानात मोठी सभा होणार आहे. शिंदे गटाने या सभेची जय्यत तयारी केली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी ही सभा आयोजित केली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याच मैदानावर जाहीर सभा झाली होती. आता याच मैदानावरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठा दावा केला.

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे १३-१४ आमदार शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ‘कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातले १३ ते १४ आमदार आमच्यात येणार हे नक्की’, असं उदय सामंत म्हणाले. ‘कोण आमच्यात येणार आहेत ते त्यांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहे’, असंही उदय सामंत म्हणाले.

ही प्रत्युत्तर देण्यासाठीची सभा नाहीए. ५ तारखेच्या सभेत असं सांगण्यात आलं की मी रिकाम्या हाताने आलेलो आहे. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, असं काही लोक सांगयला आली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देतील. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, मी भरभरून देणार आहे. मुख्यमंत्री म्हणून जे जे काही कोकणाला द्यायचं आहे ते घेऊन आलोय. आणि त्याची उधळण मुख्यमंत्री शिंदे हे या सभेत करतील. आमचे हात रिकामे आहेत म्हणून तुम्ही आमच्याकडे राहा, अशा प्रकारचं सहानुभूतीपूर्वक भाषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार नाहीत, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.

५ तारखेला जी सभा झाली त्याला आपण सभा म्हणू शकत नाही. त्याच्यामध्ये विचार नव्हता. त्याच्यामध्ये फक्त शिव्या होत्या. कोण कोणाला लांडगा, कोण कोणाला कोल्हा म्हणत होतं. एवढचं नव्हे जे माजी खासदार आहेत अनंत गीते यांनी फार मोठी टीका केली. पण बंडाची सुरुवात माणगावमध्ये अनंत गीतेंनीच सुरू केली होती. त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला, असं गीते म्हणाले होते. आणि इकडे काही लोकं सांगतात की भाजपकडे वॉशिंग मशिन आहे. मग हे विचार बदलणारं वॉशिंग मशिन काही लोकांकडे आहे. ज्यांनी बंडाशी सुरुवात केली ते एकनाथ शिंदे यांना शिकवायला चालले आहेत. त्यांच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकत नाही. यासभेतून कोकणच्या विकासाची दिशा स्पष्ट होईल. आणि तशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं भाषण असेल, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

18 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago