ताज्याघडामोडी

माहेरहून ४५ लाख आणि ५० तोळे सोनं आण, विवाहितेचा छळ; अखेर अश्लील व्हिडीओ दाखवत नवऱ्यानेच…

पत्नीने माहेरहून ४५ लाख रुपये आणि ५० तोळे सोने आणावे, या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर पत्नीने मागणी पूर्ण न केल्यामुळे पतीने तिच्या अंगावरील सुमारे ३० तोळे सोने काढून घेतले. तसेच तिला पॉर्न साईटवरील अश्लील व्हिडिओ दाखवत अनैसर्गिक कृत्य केले आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील सिडको परिसरात राहणाऱ्या पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २००९ मध्ये पीडित महिलेचा ठाणे येथील संशयिताशी विवाह झाला होता. यावेळी पीडितेच्या माहेरील मंडळींनी मुलीस स्त्रीधन म्हणून सुमारे ३० तोळे सोने दिले होते. वैवाहिक जीवनाला सुरुवात होताच महिलेचा छळ करण्यास सुरुवात झाली.

माहेरून ४५ लाख रुपये आणि ५० तोळे सोने आणावे अशी मागणी सासरचे करू लागले. पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ देखील करू लागले. याचवेळी पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची बाब उघडकीस आली मात्र पीडितेने त्याकडेही दुर्लक्ष केले.छळ करूनही महिला माहेरून पैसे व दागिने आणत नसल्याने सासू-सासर्‍यांनी तिच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेतले, तर पतीने छळ करत पॉर्न साईटवरील अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप पीडितेने दिलेल्या तक्रारीत केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

13 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago