ताज्याघडामोडी

विवाहित महिलेने उपचारादरम्यान प्राण सोडले; मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर सर्वजणच झाले सुन्न

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे असतानाही अशा घटना कमी होत नसल्याचं चित्र आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेला तब्बल १२ दिवस उपाशी ठेवण्यात आलं. त्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील विवाहितेच्या सासरच्या कुटुंबातील सदस्यांवर पिंपळकर राजा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

जळगाव जामोद दुर्गा चौकातील पवन रमेश नवथळे यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, माझी बहीण पूनम हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी भालेगाव बाजार येथील श्रीकांत प्रकाश भोरे याच्यासोबत झाला होता. श्रीकांत व त्याचे वडील प्रकाश केशव भोरे (वय वर्ष ६०), अलका प्रकाश भोरे (वय वर्ष ५५), ननंद अमृता रोहित गावत्रे (राहणार तपोवन अमरावती) यांनी संगनमत करून माझ्या बहिणीचा मानसिक व शारीरिक छळ केला. एवढेच नव्हे तर तिला १० ते १२ दिवस उपाशी ठेवले. परिणामी तिची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर तिला अकोला येथे उपचारासाठी नेले असता उपचार सुरू असतानाच तिचा ३ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. या तक्रारीवरून उपरोक्त चारही आरोपींविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी विविध कल्मान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

एकीकडे आपण प्रगतीच्या दिशेने पावलं टाकत असताना आजही महिलांना लग्नानंतर शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. अशा घटना घडल्या की काही काळ कायदे कठोर करण्याची भाषा केली जाते. मात्र त्यानंतर अशा घटना रोखण्यात अपयश येत असल्याचं दिसतं. बुलढाणा जिल्ह्यातील या ताज्या घटनेनं पुन्हा एकदा महिला अत्याचाराचं कटू वास्तव समोर आलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago