ताज्याघडामोडी

संकटात सापडलेल्या ठाकरेंना धक्का, विश्वासू नेता पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र

उद्धव ठाकरे गटाचे भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी २००१ नंतरचे अपत्य कमी दाखवल्याचे कारण देत पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय लातूर विभागीय सहनिबंधक यांनी आज दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या संकटात तसेच पक्षचिन्ह आणि पक्षनाव गमावलेल्या ठाकरेंना हा मोठा धक्का आहे.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्ञानेश्वर पाटील हे संचालक होते. प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. २१ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील यांनी अपत्य कमी दाखवल्याचे कारण देत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे उस्मानाबादचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तक्रार केली होती.

ज्ञानेश्वर पाटील यांचा पहिला विवाह सौ सिंधु यांच्या बरोबर झाला होता. त्यांचे आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्यापासून पाटील यांना पहिले अपत्य ७ मार्च १९९३ रोजी झाले होते तर दुसरे अपत्य १२ ऑगस्ट १९९५ रोजी झाले होते. या नंतर पाटील यांनी सौ. राणी उर्फ उषा यांच्या बरोबर दुसरा विवाह केला. त्यांच्या पासून पहिले अपत्य १५ सप्टेंबर २००६ रोजी झाले तर दुसरे अपत्य १५ ऑक्टोबर २००८ रोजी झाले. या चारही अपत्यांच्या जन्माची नोंद बार्शी नगर परिषदेत करण्यात आली होती.

दरम्यान २००१ नंतर २ अपत्य असल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी धनंजय सावंत यांनी केली होती. याची सुनावणी लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी करताना पुढील ५ वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नाही, असा निर्णय दिला आहे.

ज्ञानेश्वर पाटील हे भूम परंडा मतदारसंघातून २ वेळेस शिवसेनेचे आमदार होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे जवळचे निकटवर्तीय होते. बंडखोरीनंतर ज्ञानेश्वर पाटील हे उद्धव ठाकरे गटात आहेत. भूम परंडा मतदारसंघात ज्ञानेश्वर पाटील यांचं अधिक प्राबल्य आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago