ताज्याघडामोडी

नगरसेवकाने केली घाणेरडी मागणी

अभिनेत्रीने शिकविला धडा 

पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये रहात असताना आपार्टमेन्टचा मालक असलेल्या नगरसेवकाने  अभिनेत्री तेजस्विनी पंडित या भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांना थेट ‘ऑफर’ दिली’ असल्याची धक्कदायक माहिती तेजस्विनी पंडित यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
    मात्र नगरसेवकाने अशी मागणी करताच  टेबलावर पाण्याचा ग्लास होता, तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला. मी अशा गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केला नाही, अन्यथा मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहिले नसते. मी घरं आणि दारात गाड्या उभ्या केल्या असत्या, असं नगरसेवकाला सुनावल्याचं तेजस्विनी पंडित यांनी सांगितले.
“माझ्या व्यवसायामुळे आणि माझी आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांनी माझ्या बाबतीत हे धाडस केलं. पण माझ्यासाठी हा एक शिकण्याचा अनुभव होता.”असंही त्या म्हणाल्या.

तेजस्विनी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची कन्या आहे. तेजस्विनीने २००४ मध्ये केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून पदार्पण केले. मी सिंधुताई सपकाळ, तू हि रे, देवा, एकतारा यासारख्या अनेक चित्रपटात ती झळकली आहे. याशिवाय रानबाजार, समांतर या तिच्या वेबसीरिजही गाजल्या आहेत. एकाच या जन्मी जणू, लज्जा यासारख्या मालिकांतूनही तिने अभिनय केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago