ताज्याघडामोडी

फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये इलेकट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचा पालक मेळावा संपन्न

सांगोला :येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये इलेकट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन
विभागातर्फे विद्यार्थी ,पालक व शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला .
विद्यार्थी पालक व
शिक्षकांमध्ये संवाद व्हावा व विद्यार्थ्यांची प्रगती पालकांना समजावी या
उद्देशाने मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते . दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आल्यानंतर
उन्हाळी परीक्षा २०२२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इलेक्ट्रॉनिक्स अँड
टेलिकम्युनिकेशन   विभागाचे प्रमुख प्रा. महेश वाळुंजकर  यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड
टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे  आयॊजीत करण्यात आलेले विविध उपक्रम, टेस्ट सिरीज ,
सामाजिक उपक्रम यासंदर्भात माहिती दिली.  पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.
शरद पवार यांनी
रोजगाराभिमुख विद्यार्थी तयार होण्याच्या अनुषंगाने महाविद्यालया मार्फ़त आयोजित
करण्यात येणाऱ्या  टेक्निकल वर्कशॉप, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, तसेच
महाविद्यालया मध्ये
उपलब्ध असणाऱ्या  डिजिटल लायब्ररी यासारख्या साधनांचा उपयोग करून
विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करण्या बरोबरच पालकांची शैक्षणिक
अपेक्षा पूर्ण करून त्यांना आनंद देण्याचे
आवाहन केले.  या  वेळी पालक प्रतिनिधी श्री. सिध्दनाथ मेटकरी  यांनी
महाविद्यालया मार्फत
पुरविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे
प्रास्ताविक,  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गणेश शिंदे यांनी केले
. हा कार्यक्रम यशस्वी
होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन  विभागातील  प्रा. राहुल
काळे व प्रा.स्नेहल
ठोंबरे यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर पालक मेळाव्यास विभागातील सर्व
शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago