ताज्याघडामोडी

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात ३ दिवस मुसळधार पाऊस

हवामान विभागाचा माहिती

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार  पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुण्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळतात. तर मागच्या दोन दिवसांपासून उघडीप घेणारा पाऊस आता पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि छत्तीसगडकडे पुढे सरकले आहे. या परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यानंतर राज्यातील पाऊस कमी होण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचा आस पुढील आठवड्याच्या शेवटी मूळ जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील पाऊस कमी होणार आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट  जारी करण्यात  आला असून, शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण तसेच घाटमाथ्याच्या परिसरात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

राज्याती पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे. लोणावळा, मुळशी, ताम्हिणी, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी, घोटी, इगतपुरी या परिसरात जोरदार पाऊस कायम राहणार आहे. साधारणपणे तीन दिवसांनंतर म्हणजेच मंगळवारनंतर ता. 23 पावसाचे प्रमाण कमी होईल. काही ठिकाणी तुरळक आणि हलका पाऊस बरसत राहणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

23 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago