सहकार्याच्या आश्वासना बद्दल मानले आभार
पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाचा व राजकारणाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच पार पडलेल्या निडवणुकीत अभिजित पाटील यांच्या नेत्तृत्वाखालील पॅनलने विजय संपादन करीत विठ्ठल परिवारातील दोन मात्तबर गटांना पराभूत केले होते.मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक दूर करण्यासाठी व विठ्ठल कारखान्यास आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अभिजित पाटील यांनी पदभार हाती घेताच तातडीने पावले उचलण्यास सुरवातही केली असल्याचे दिसून येत आहे.मात्र याच वेळी विजय संपादन केल्यानंतर त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेण्यास सुरवात केली असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वां शरद पवार यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली होती तर आज अभिजित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून यावेळी आमदार प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचाली साठी सहकार्याचे आश्वासन दिल्याबद्दल अभिजित पाटील यांनी आभार मानले.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…